
भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्याआधी सहस्रो वर्षे मनुस्मृति लिहिली गेली आहे. महर्षि मनु यांनी वेदांचा अभ्यास करून कायदा-सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यांसाठी मनुस्मृति हा ग्रंथ लिहिला. वर्ष १७९४ मध्ये विल्यम जोन्स या इंग्रजाने मनुस्मृतीचा अनुवाद इंग्रजीत केला. मनुचे आकर्षण असणार्या या व्यक्तीच्या लंडन येथील सेंट पॉल कॅथेड्रल मध्ये असलेल्या पुतळ्याच्या हातात मनुस्मृति हा ग्रंथ दाखवण्यात आला आहे. जगामध्ये अजूनही मनुस्मृति हा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. ऑक्सफोर्ड विद्यापिठाच्या प्रकाशकांनी नुकताच मनुस्मृतीवरील तौलनिक आणि संशोधनपूर्ण ग्रंथ प्रकाशित केला. पॅट्रिक ऑॅलिवेल या भारतीय वंशाच्या अमेरिकन अभ्यासकाने हा ग्रंथ संपादित केला आहे.
१. महर्षि मनु ब्राह्मण नव्हे, तर क्षत्रिय होते !
मनु जन्माने ब्राह्मण होते, असे गृहीत धरून ब्राह्मणद्वेषापोटी
त्यांच्या नावाने काही जण गोंधळ घालतात. वास्तविक मनु हे ब्राह्मण नव्हते,
तर क्षत्रिय होते. ज्या जातीयवादाविषयी मनुस्मृतीला दोषी ठरवले जाते, त्या
मनुस्मृतीमध्ये जातीयवादाचा उल्लेखही नाही. दलित हा शब्दप्रयोग मनूने कधीच
केला नाही. कोणत्याही धर्मग्रंथात दलित हा शब्द नाही. इंग्रजांनी तो भारतात
फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करण्यासाठी आणला.
२. गुण-कर्मानुसार ठरवला जाणारा व्यक्तीचा वर्ण
महर्षी मनु यांनी सांगितले आहे, जन्मना जायते शुद्र:। म्हणजेच
व्यक्ती जन्मत: शुद्र असते. नंतर ती तिच्या गुण-कर्मानुसार (गुण म्हणजे
सत्त्व-रज-तम) ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अथवा शुद्र ठरवली जाते. एखाद्या
ब्राह्मणाचे अपत्य गुण-कर्मानुसार ब्राह्मण नसेल, तर त्याला शूद्र ठरवले
जाते, तसेच शुद्राचे अपत्य गुण-कर्मानुसार ब्राह्मण, क्षत्रियही ठरवले
जाते.
उदाहरणार्थ, मत्सगंधेचा पुत्र व्यास तपश्चर्याने महर्षी व्यास झाले.
क्षत्रिय विश्वामित्र साधना करून ऋषी झाले. दरोडे घालणारा वाल्या कोळी
तपश्चर्या करून वाल्मीकि ऋषी झाला, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.
३. विरोधकांनो, विरोधासाठी विरोध करू नका !
आजही शासन-प्रशासनात ४ वर्गांनुसार अधिकारांच्या श्रेणी ठरवतात. आजही
अनेक क्षेत्रांत वर्गवारी गुण-कर्मानुसारच ठरवली जाते. ती आपण मान्य करतो.
मग धर्मग्रंथांत लिहिलेले का मान्य नाही करत ?
या कारणांसाठीच मनुस्मृतीविरोधक, धर्मग्रंथविरोधक आणि पुरो(अधो)गामी
यांना मी आवाहन करते की, अभ्यास न करता धर्मग्रंथांना केवळ विरोधासाठी
विरोध करू नका ! ज्या (अ)श्रद्धेने विरोध करता, तेवढ्याच श्रद्धेने हिंदु
धर्मग्रंथ वाचा आणि समजून घ्या ! त्यातच सर्वांचे भले आहे.
- अधिवक्त्या सौ. श्रुती श्रीकांत भट, अकोला. (१६.३.२०१६)
Post a Comment