चांदूर रेल्वेः / शहेजाद खान /-----
चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी श्री जनार्धन विधाते यांच्या नियोजनबध्द कार्यक्रमानुसार धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आ.प्रा.श्री वीरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली वन विभाग व महसुल विभाग यांनी स्थानिक एसडीओ कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात १ जुलै रोजी २ कोटी वृक्ष लागवड करून जंगल संवर्धन, हवामान संतुलन व पशुपक्ष्यांचे संवर्धन आणि जमीनीची धूप थांबवावी असे आवाहन आ.श्री वीरेंद्र जगताप यांनी जनतेला केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, जि.प.सदस्य श्री प्रविण घुईखेडकर, जि.प.सदस्य श्री उमेश केने, चांदूर रेल्वे नगराध्यक्ष श्री अभिजित सराड, धामणगाव नगराध्यक्ष अर्चना राऊत, नांदगाव खंडेश्वर पं.स.सभापती शोभा इंगोले, चांदूर रेल्वे पं.स.सभापती अॅड. श्री किशोर झाडे, वन परिक्षेत्र अधिकारी श्री अनंत गावंडे, लागवड अधिकारी श्री.काळे उपस्थित होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मापदंडानुसार भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादन आवश्यक असतांना महाराष्ट्र देशात प्रगतशील व विकासामध्ये अग्रगन्य राज्य आहे. या राज्यात वृक्ष आवरणाचे प्रमाण केवळ २० टक्के आहे. सपाट्याने कमी होत चाललेल्या वृक्षामूळे तापमानात होत असलेली वाढ, वातावरणात बदल, बदलेला निसर्ग व ऋतुचक्र, अनियमीत पर्जन्यमान, अतिवृष्टी किंवा दुष्काळ होऊन काही वर्षात निसर्ग आपल्याला जाणिव करून देत आहे. या सर्व बदलाची तिव्रता व परिणामकारकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनने विविध विभाग व जनतेच्या सहभागातून पावसाळ्यात १ जुलै रोजी वन महोत्सवाचे आयोजन केले असुन या कार्यक्रमात धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रात चांदूर रेल्वे तालुक्यात ३४ हजार ७२०, धामणगाव तालुक्यात १९ हजार ४६० व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात २१ हजार ५० असे एवूâण ७५ हजार २३० वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. आमदार जगताप यांनी धामणगाव रेल्वे मतदार संघात शासनाच्या विविध विभाग व जनतेच्या सहभागातून चांदूर रेल्वे ,धामणगाव व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ग्रा.पं.ते जि.प.सर्वâल व शहरात जांभुळ, आवळा, कविट, सिताफळ, रामफळ या फळझाडांसह इतर वृक्षाची लागवड करणार असल्याचे सांगीतले. चांदूर रेल्वे तालुक्यात वन विभाग ३ हजार आवळा, दिड हजार सिताफळ व ११ हजार इतर वृक्षाची लागवड करणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे यांनी सांगीतले. यावेळी एसडीओ जनार्धन विधाते यांनी मार्गदर्शन केले. चांदूर रेल्वे तहसीलदार बी.ए.राजगडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या आढावा बैठकीला नांदगाव खं.तहसीलदार वाहूरवाघ, चांदूर रेल्वे बिडीओ सुनिल तलवारे, नायब तहसीलदार दिनेश बढीये, तालुका कृषी अधिकारी ठाकरे, धामणगाव तहसीलदार, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर चे महसुल विभाग, वन विभाग, कृषी विभाग, सा.बां.विभाग, पंचायत समिती व पोलीस विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
Post a Comment