मुंबई -
डीएनए या इंग्रजी दैनिकाच्या २६ जून २०१६ च्या अंकात Pressure grown on government to ban Sanstha (सनातनवर बंदी घालण्याविषयी संघाचा शासनावर दबाव) या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. या वृत्तात संघाच्या उच्चपदस्थ व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे सध्याचे राज्यशासन संघाच्या दबावामुळे सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा विचार करत आहे, असे म्हटले आहे. आतापर्यंत सीबीआयच्या अधिकार्यांच्या हवाल्याने वृत्ते दिली जात होती; मात्र प्रथमच रा.स्व. संघासारख्या एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या हवाल्याने वृत्त दिले गेले आहे. या वृत्तामुळे एक मोठी हिंदुत्ववादी संघटना दुसर्या लहान संघटनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा चुकीचा संदेश समाजात जात आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर होणार्या आरोपांच्या संदर्भात रा.स्व. संघाची नेमकी अधिकृत भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे. या दृष्टीने हिंदु समाजामध्ये योग्य संदेश जावा आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये फूट पाडणार्या शक्तींना रोखता यावे, यासाठी रा.स्व. संघ आणि भाजप शासन यांनी या वृत्ताविषयी खुलासा करावा, अशी मागणी सनातन संस्थचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Post a Comment