हिंदुद्वेषी संभाजी ब्रिगेडची भर पत्रकार परिषदेत धमकी !
सनातनद्वेषाने पछाडलेले प्रा. डॉ. भानुसे यांनी सनातनविषयी केलेली धांदात खोटी विधाने
१. सनातन संस्थेच्या वतीने आतंकवादी प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारे
बजरंग दलाच्या वतीने दिल्या जाणार्या प्रशिक्षणावर नुकतीच कारवाई करण्यात
आली आहे. २. सनातन संस्थेची ११९ खाती अधिकोषात आहेत. त्यात कोट्यवधी रुपयांचा पैसा येत आहे. अशा प्रकारे आतंकवादी कारवाया करणार्या संस्थेला कोण निधी देते, त्यांचीही चौकशी करण्यात यावी.
३. सनातन संस्था ही विकृत विचारांची संघटना असून तिच्या वतीने चालू असलेले आतंकवादी प्रशिक्षण म्हणजे लोकशाहीवर घाला आहे.
४. सनातन संस्थेच्या वतीने ठराविक लोकांचा वापर करून त्यांचा वापर अशा कारवायांसाठी केला जातो. या वेळी प्रा. भानुसे म्हणाले -
१. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे सनातनला पाठीशी घालण्यात येत आहे. डॉ. दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे यांचा खून कुणी केला, हे तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य लोकांना सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्र पोलिसांनाही याची माहिती नाही, असे नाही; मात्र महाराष्ट्र शासन सनातन संस्थेवर कारवाई करत नाही.
२. कलबुर्गी हत्या प्रकरणी प्रथम कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथील पोलिसांना धागेदोरे मिळाले. त्यांच्याकडून कारवाई होऊ नये, यासाठी नाईलाजास्तव महाराष्ट्र पोलिसांनी समीर गायकवाडला अटक केली.
(म्हणे) गोवंशहत्या बंदी कायदा म्हणजे शेतकर्यांवर अन्याय !
गोवंशहत्या बंदी कायदा रहित करण्यात यावा. जनावरे म्हातारी झाल्यावर २
ते ३ सहस्र रुपयांना विकली जातात; मात्र कसाई २५ ते ३० सहस्र रुपये देत
असल्याने शेतकर्यांची आर्थिक हानी होते. त्यामुळे गोवंशहत्या बंदी कायदा
म्हणजे शेतकर्यांवर अन्याय करणारा आणि त्यांची आर्थिक पिळवणूक करणारा
कायदा आहे, असे प्रा. डॉ. भानुसे या वेळी म्हणाले.
(म्हणे) सनातनवर बंदी घालावी !
या वेळी प्रा. डॉ. भानुसे म्हणाले की, सनातनवर बंदी घालण्यात
यावी. त्या वेळी पत्रकारांनी त्यांना २ ते ३ वेळा विचारले, सनातवर बंदी
घालावी या मागणीसाठी तुमच्याकडे काय पुरावे आहेत ? उद्या तेही तुमच्या
संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करतील. प्रा. डॉ. भानुसे यांना या प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने त्यांनी थातुरमातुर उत्तरे देऊन सारवासारव केली. ते म्हणाले, शासनाला सनातनवर कारवाईच करायची नाही. या तिन्ही खुनांच्या संदर्भात त्यांचा हात असल्याचे सिद्ध झाले, तर बंदी घालावी.
सनातनवर कारवाई करण्याच्या मागणीच्या पत्रकार
परिषदेसाठी वेगळ्या विषयाच्या पत्रकार परिषदेचे नाटक ?
७ व्या वेतन आयोगामध्ये शेतीमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी ही
पत्रकार परिषद आयोजित केली आहे, असे त्यांनी आरंभी सांगितले. प्रत्यक्षात
वरील मागणीच्या संदर्भात आणि सनातनवरील कारवाईच्या संदर्भात अशी दोन
प्रसिद्धीपत्रके संभाजी ब्रिगेडच्या वतीने काढण्यात आली होती. या वेळी पत्रकारांनी त्यांच्या लक्षात आणून दिले की, आज सातवा वेतन आयोग घोषित झाला आणि त्याच्यात हामीभाव दिलेला नाही. त्यामुळे प्रा. डॉ. भानुसे यांचा चांगलाच फज्जा उडाला. नंतर ते म्हणाले की, ६ मासांत हामीभाव घोषित करावा, यासाठी निवेदन देऊ.
Post a Comment