BREAKING NEWS

Saturday, June 4, 2016

दामरचा गावात नक्षल धिक्कार सभेचे यशस्वी आयोजन - पत्रू दुर्गे चे काय चुकले? – स्थानिकांनी नक्षलवाद्यांना केला सवाल नक्षलवाद्यांच्या “लाल सलाम” विरुद्ध गरजला आंबेडकरी “जय भीम”

रंगय्या रेपाकवार / गडचिरोली /--


दि. २/६/२०१६ रोजी अहेरी तालुक्यातील दामरनचा  गावात भुमकाल संघटने तर्फे नक्षलवादी द्वारा दलित हत्याकांड विरोधी जाहीर धिक्कार सभा घेतली. या भागात १२ महिने २४ तास नक्षलवादी दहशतीचे वातावरण आसते, सतत कुणाला ना कुणाला शुल्लक कारणासाठी नक्षलवादी हत्या करतात. त्याच परिसरात नक्षलवाद विरोधात दोन हजार च्या जवळ लोकांनी सभेला हजेरी लावली. विशेष बाब म्हणजे ह्या मार्गात रोड रस्ते पूल नसल्याने प्रवासाची साधणे अत्यल्प आहेत शासणाच्या बसेस कुठेच चालत नाहीत. अशा भागातून १०-१२ किमी. पासून शेकडो लोक पायी-पायी येवून सभेला हजर होते. अतिदुर्गम भागातील मनेराजाराम, दुब्बगुदा, बामनपल्ली, मान्ध्रा, येरमनार, कुरुमपल्ली, तोंडेर, चीटवेली, नैनगुण्दम अश्या साधारण दहा गावातून लोकांनी उपस्थिती दाखवूण ते नक्षलवादी विरूध्दच्या दहशतीने चिडलेले आहेत याचे शक्ती प्रदर्शन केले. ही सभा भारतातील प्रथम घटना आहे ज्यात नक्षलवाद्या विरूध्द त्याचे गड असलेल्या भागातत्याच्या निषेधा साठी येवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही सभा होऊ नये म्हणून नक्षलवाद्यानी लोकांना धमकीचे पत्र काढले होते. तरी लोकांचा उत्स्फुर्त साथ कार्यक्रमाला मिळाला यातून या भागात लोकांना नक्षलवाद नव्हे विकास पाहिजे हे दिसले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्ध वंदना झाली. त्यानंतर नक्षल्वाद्यानी आजपर्यंत मारलेल्या २३ दलित बांधवाना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ता आंबेडकरी कार्यकर्ते  प्रा. श्रीकांत भोवते होते. यांनी नक्षलवाद्यांच्या अमानविय कृत्याविषयी खुली खुली चर्चा केली. दलम मध्ये दलित आदिवासी आणि  बहुजन समाजाचे मूलं पळवून घेवून जातात त्यांना ह्याच समाजाच्या विरूध्द गोळ्या चालवायला त्यांची मानसिक दिशाभूल करतात. नक्षलवादीने आजपर्यंत २३ पेक्षा जास्त दलितांची हत्या केली कारण दलित समाज  नक्षलवादाला साथ देत नाही असे भोवते म्हणाले. गावात आले तरी नक्षलवादी दलित मोहोल्ल्यात येण्याची हिम्मत करत नाहीत कारण दलित समाज शिकलेला व संघर्ष करणारा आहे, काय चूक व काय बरोबर आहे ते त्या कळते असे भोवते म्हणाले. नक्षलवादी दलम मध्ये असणार्‍या कोवळ्या मूलीचे शोषण करतात याची अनेक उदाहरणे देऊन ते अमानुष  आहेत हे सांगीतले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.