रामनाथी (गोवा) - पूर्वी तत्त्वाला अनुसरून राजकारण केले जात होते; परंतु आताचे राजकारण बदलले आहे. आता राजकारणी बोलतात एक आणि करतात वेगळेच ! राजकारणात शिरल्यानंतर धर्मकार्य करण्यास अनेक बंधने येतात. त्यामुळे असले गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा निर्भयतेने धर्मकार्य करा. जो धर्मकार्य करतो, त्याचे साक्षात् ईश्वअर रक्षण करतो, असे प्रतिपादन तेलंगण येथील भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी केले. रामनाथी, गोवा येथील रामनाथ देवस्थानच्या सभागृहात आयोजित केलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या समारोपसत्रात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर राजस्थानमधील सिरोही संस्थानचे महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर, वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील हिंदु विद्या केंद्राचे संचालक प्रा. रामेश्वलर मिश्र, राष्ट्रीय धर्मसभा नेपाळचे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराई, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे उपस्थित होते. आमदार राजासिंह ठाकूर पुढे म्हणाले, भाजप सरकारला सत्तेत येऊन 2 वर्षे पूर्ण झाली; पण या 2 वर्षांत हिंदूंवरील अन्याय कमी झाल्याचे आजही दिसत नाही. साधूसंतांना खोट्या आरोपांखाली कारागृहात डांबले जात आहे. गोहत्या, लव्ह जिहाद आणि हिंदूंचे फसवून धर्मांतर करणार्यां वर नव्हे, तर ते रोखणार्या हिंदूंवरच कारवाई केली जात आहे. हिंदूंचे सरकार असूनही हिंदु आणि हिंदुत्व यांवर अन्याय का होत आहे ?
साधनाविरहित राष्ट्रवाद पोकळ आणि विनाशकारी ! - प्रा. रामेश्व र मिश्र, वाराणसी
धर्म हा राष्ट्रवादाचा पाया आहे. साधनेविना असलेल्या राष्ट्रवादामध्ये अनेक अडचणी येतात. जगातील सर्व देशांतील कायदे त्यांच्या संस्कृतीच्या आधारे बनवले गेले असतांना भारतात तसे का होऊ नये ?, असा प्रश्नअ उपस्थित करत प्रा. रामेश्वार मिश्र यांनी साधनाविरहित राष्ट्रवाद हा पोकळ आणि विनाशाकडे नेणारा असल्याचे सांगितले.
आगामी काळात इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र हेच दोन पर्याय ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
जेव्हा धर्माला अधर्माचे स्वरूप प्राप्त होते, तेव्हा धर्मशास्त्रात त्याला भीषणकाळ म्हटले जाते. सध्या धर्मविरोधी शक्तींचे उदात्तीकरण होत आहे. जगभर इसिसचे संकटही वाढत आहे. त्यामुळे येणार्यार काळात धर्मनिरपेक्ष राष्ट्र कि हिंदु राष्ट्र असा नव्हे, तर इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र असा प्रश्नर निर्माण होणार आहे. त्यामुळे हिंदूंनी संघटनाच्या जोडीला संघर्षाची सिद्धता ठेवावी, असे आवाहन पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर म्हणाले, जगभरात 46 इस्लामी राष्ट्रे आहेत. क्षत्रियांच्या योगदानामुळेच भारतात हिंदू शिल्लक आहेत अन्यथा भारत केव्हाच इस्लामी राष्ट्र झाले असते.
जगाच्या पाठीवर एकमेव हिंदु राष्ट्र असलेले नेपाळ तेथील नेपाळी जनतेचा विरोध डावलून धर्मनिरपेक्ष म्हणून घोषित करण्यात आले. तेथील हिंदूंचा त्यासाठी लढा चालूच असून येत्या 2 वर्षांत नेपाळला पुनश्चल हिंदु राष्ट्र बनवू, असा विश्वा स डॉ. माधव भट्टराई यांनी व्यक्त केला.
Post a Comment