BREAKING NEWS

Tuesday, July 12, 2016

हिंदु धर्मप्रसाराचे काम करणार्‍या सनातन संस्थेवर अन्याय होऊ देऊ नका ! - हरिदास पडळकर, शिवसेना

सांगली, --- -




सनातन संस्था हिंदु धर्मप्रसाराचे पुष्कळ चांगले काम करत आहे. अशा संस्था असणे हे हिंदु धर्मासाठी भूषणावह आहे. हिंदु धर्मावर वृथा आरोप करणार्‍या तथाकथित पुरोगामी लोकांना सनातन संस्थेने नेहमीच न्यायलयीन, तसेच वैध मार्गाने विरोध केला आहे. अशा संस्थेच्या साधकांना नाहक अटक करणे, तसेच त्यांना त्रास देणे या गोष्टी शासनाकडून होणे अपेक्षित नाहीत. तरी या संदर्भात भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावे आणि हिंदु धर्मप्रसार करणार्‍या सनातन संस्थेवर अन्याय होऊ देऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख श्री. हरिदास पडळकर यांनी केली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय रेठरेकर आणि श्री. हरिदास पडळकर यांनी सनातन संस्थेवर होत असलेल्या आरोपांविषयी सांगली विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांची भेट घेतली, त्या वेळी श्री. पडळकर यांनी ही मागणी केली. या वेळी श्री. गाडगीळ यांनी या विषयाच्या संदर्भात लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.