चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-
स्थानिक नगरपरीषद हद्दीतील विविध मागण्यांसाठी आरोग्य, स्वच्छता व शिक्षण सभापती नितीन गवळी यांनी मुख्याधिकाऱ्यांना १८ जुलैपासुन उपोषणाचा इशारा दिला होता. यामध्येच दिव्यांगांना साहित्य वाटप न झाल्यामुळे तातडीने साहित्य वाटप करण्याची मागणी केली होती. याचीच दखल घेत अखेर आज मंगळवारी स्थानिक नगर परीषदमध्ये शहरातील दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप करणार असल्याचे मुख्याधिकारी ठाकरे यांनी नितीन गवळींना दिलेल्या पत्रातुन केली आहे.
नियमानुसार नगरपरीषद वार्षीक निधीतील ३% निधी शहरातील दिव्यांगांकरीता राखीव असतो. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात शहरातील दिव्यांगांना साहित्य वाटप झाले नव्हते. त्यामुळे आक्रमक झालेले नितीन गवळी यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. याचीच दखल घेत अखेर आज दिव्यांगांना स्थानिक नगरपरीषदमध्ये साहित्य वाटप होणार आहे. अपंगाच्या निधीतील नगरपरीषद अंतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात १६९००० रूपयाचे साहित्य खरेदी केले. तसेच २०१६-१७ चा अपंगांचा ३% निधी राखीव असुन अपंगांना आवश्यक साधन सामग्री खरेदी करण्यात येणार आहे.
समाजातील दिव्यांग लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीने अशा कार्यक्रमाचे विशेष महत्त्व आहे. दिव्यांग व्यक्तींबद्दल संवेदनशील भावना जपणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. त्यांना सन्मानाने जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्या योजनांचा आणि उपक्रमांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे मत नितीन गवळी या़ंनी आमच्या प्रतिनीधीजवळ व्यक्त केले.

Post a Comment