मुंबई, /----
सनातनचे कार्य मला माहीत आहे. डहाणू येथे सनातनचे कार्य आरंभ करण्यासाठी मी सहकार्य केले आहे. सनातनचे कार्य खूप चांगले आहे, अशा शब्दांत दहिसर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार सौ. मनीषा चौधरी यांनी सनातनच्या कार्याची स्तुती केली. १२ जुलै या दिवशी हिंदुत्ववादी आणि सनातन संस्था यांच्या वतीने आमदार सौ. मनीषा चौधरी यांची बोरीवली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना सनातनवरील बंदीचे षड्यंत्र हाणून पाडावे, यासाठी निवेदन देण्यात आले. या प्रसंगी त्यांनी वरील प्रतिपादन केले. या वेळी हिंदु गोवंश रक्षा समितीचे समन्वयक श्री. वैभव राऊत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद काळे, सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रेय बेंद्रे उपस्थित होते.
या वेळी आमदार सौ. मनीषा चौधरी यांनी त्वरित भाजपचे राज्य संघटन महामंत्री श्री. रवींद्र भुसारी यांना दूरभाषवर संपर्क करून सनातनच्या साधकांची त्यांच्याशी भेट घडवून आणण्यासाठी त्याच दिवशी भेटीची वेळ ठरवून दिली. या वेळी आमदार सौ. चौधरी यांनी सनातनच्या साधकांना पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांची भेट घेण्यास सांगितलेे.

Post a Comment