पनवेल -
निर्दोष हिंदूंच्या सुटकेकरिता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू आणि हिंदुविरोधी शक्तीचा बिमोड करू, असे आश्वासन पनवेल येथील भाजपचे आमदार श्री. प्रशांत ठाकुर यांनी दिले. दाभोलकर आणि पानसरे हत्यांच्या प्रकरणात सनातन संस्थेच्या निष्पाप साधकांना गुंतवणे थांबवावे, तसेच चौकशीच्या नावाखाली चालू असलेला छळ थांबवावा आणि सनातनवर बंदी घालण्याच्या मागणीला येत्या पावसाळी अधिवेशनात विरोध करावा, यासाठी आमदार श्री. प्रशांत ठाकुर यांंना पनवेल येथील हिंदुत्ववाद्यांनी निवेदन दिले. त्या वेळी ते बोलत होते.
पनवेल येथील महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष श्री. ठाकुर अजयसिंह सेंगर, स्वराज्य मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ मुंबईकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे आणि सनातन संस्थेच्या अभया उपाध्ये या वेळी उपस्थित होते.
याविषयीचे प्रसिद्धीपत्रकही श्री. सेंगर यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिले. त्यात श्री. सेंगर यांनी म्हटले आहे, सनातनच्या पाठीशी आता हिंदुत्ववादी शक्ती एकत्र येत आहेत, हे विशेष आहे.

Post a Comment