BREAKING NEWS

Friday, July 15, 2016

पुरोगाम्यांच्या दबावाला महाराष्ट्र शासनाने बळी पडून सनातन संस्थेवर बंदी आणू नये ! - ह.भ.प. ज्ञानेश्‍वर विष्णु महाराज कोल्हापूरकर

पंढरपूर (जिल्हा सोलापूर),


 
 - सनातन संस्थेचे कार्य गेली कित्येक वर्षे वारकरी संप्रदायाने जवळून पाहिले आहे. सनातन संस्था समाजाला धार्मिक शिक्षण देऊन सुसंस्कृत बनवण्याचे कार्य करत आहे. महाराष्ट्र शासनाने पुरोगाम्यांच्या दबावाला बळी पडून सनातन संस्थेवर बंदी आणणे म्हणजे देश आणि धर्म यांच्या पायावर स्वत:हून दगड मारण्यासारखे आहे. हिंदु संस्कृतीचे शिक्षण देणारी ही भारतातील अग्रगण्य संस्था आहे. सनातन संस्थेला ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर (आपेगांव संस्थान) यांचा संपूर्ण पाठिंबा आहे. समाजामधील काही विघ्नसंतोषी आणि समाजविद्वेषक संघटना समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सनातन संस्थेवर खोटे आरोप करून समाजातील वातावरण आंदोलने करून गढूळ करत आहेत. त्यांच्यावरही शासनाने कार्यवाही करावी आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता सनातन संस्थेवर बंदी आणू नये, अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर (आपेगांव) यांच्या दिंडीचे कुर्डुवाडी मुक्कामी पालखी सोहळ्याच्या वेळी एका बैठकीनंतर काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे ह.भ.प. ज्ञानेश्‍वर विष्णु महाराज कोल्हापूरकर (दादा) यांनी वरील मागणी केली. वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी आहे, असे आश्‍वस्त मतही ह.भ.प. ज्ञानेश्‍वर विष्णु महाराज कोल्हापूरकर यांनी या वेळी व्यक्त केले.
        या वेळी सोहळ्यामध्ये सर्वश्री ह.भ.प. शिवाजी महाराज खवणे (सेलु), विनायक अष्टेकर (संभाजीनगर), गणेश महाराज तराशे (संभाजीनगर), कल्याण महाराज तांबे (पैठण), तसेच चंद्रकांत महाराज धुमाळ (पैठण) यांसह १ सहस्रांहून अधिक वारकरी उपस्थित होते.
        ह.भ.प. ज्ञानेश्‍वर विष्णु महाराज कोल्हापूरकर (दादा) यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यापासून संस्थेच्या साधकांवर खोटे पुरावे दाखवून विनाकारण संस्थेची अपकीर्ती चालवली आहे. सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना गेल्या आठ महिन्यांपासून अटक करून ठेवली आहे. पण त्यांच्यावर अजून कोणतेही दोषारोप पोलीस खाते ठेवू शकले नाही. त्यांच्याकडे पुरावे नाहीत. शासन केसही चालवत नाही आणि जामीन मिळण्यामध्ये तांत्रिक अडचणी आणल्या जात आहेत.
        तसेच डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने नुकतीच अटक केलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या विषयीही ठोस पुरावे मिळालेले नाहीत, तरीही एक महिन्याहून अधिक कालावधीपासून त्यांचा छळ चालू आहे, तो थांबवण्यात यावा. तसेच सीबीआयची सनातनच्या आश्रमावर धाड पडण्यापूर्वी आणि डॉ. तावडेंना अटक करण्यापूर्वीच ही माहिती आपचे आशिष खेतान यांचेकडे एक दिवस अगोदरच कशी जाते ? यातच हे सुनियोजित षड्यंत्र आहे हे लक्षात येते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.