मुंबई -
कोपर्डीतील बलात्काराची घटना ही मानवतेला काळीमा फासणारी आहे. अशा अमानुष प्रकरणातील दोषी नराधमांना फाशीपर्यंत पोहचवून समाजाला योग्य तो संदेश दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना निश्चित वेळेत फाशी मिळावी यासाठी राज्य सरकार हा खटला जलदगती न्यायालयात चालवेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
बलात्काराच्या घटनेला अवैध दारू धंद्याचा संदर्भ असल्याची कुजबूज आहे. त्यामुळे अवैध दारूचा व्यवसाय करणाऱया गुन्हेगारांना आता तीन ऐवजी १० वर्षाची शिक्षा केली जाईल. यासंदर्भातील विधेयक लवकरच विधिमंडळात मांडण्यात येईल. याशिवाय हा गुन्हा अजामीनपात्र ठरविला जाईल. अवैध दारू धंद्यात वारंवार पकडल्या जाणार्या व्यक्तींवर एमपीआयडी कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत विरोधी पक्षाने सभात्याग केला.
कोपर्डी (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणावर आज विधानसभेत दोन्ही बाजूने वादळी चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना देवेंद फडणवीस यांनी घटनाक्रम सांगत पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास किंवा तपास करण्यात दिरंगाई केली नसल्याचा दावा केला. गुन्ह्याची तक्रार आल्यानंतर अवघ्या ३१ मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहचले आणि गुन्हा नोंद करून तीन आरोपींना लगेच अटक केली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

Post a Comment