BREAKING NEWS

Wednesday, July 20, 2016

तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्‍या सैराट मराठी चित्रपटावर बंदी घाला ! - आमदार मनीषा चौधरी

१३ जुलै या दिवशी नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या प्रकरणाचा १९ जुलै या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी सदस्य यांनी निषेध करून मुलीची हत्या करणार्‍या ४ नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि पुन्हा असे गुन्हे न घडण्यासाठी कायद्यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद करावी, अशी एकमताने मागणी केली. तसेच सैराटसारखे चित्रपट पाहून समाजात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे सैराट या मराठी चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी भाजपच्या आमदार सौ. मनीषा चौधरी यांनी विधानसभेत केली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.