मुंबई--- - भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी यांविरुद्ध गेल्या ६ मासांतील कारवाईची आकडेवारी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यात महसूल आणि पोलीस विभागच हे आघाडीवर आहेत. जानेवारी ते जून २०१६ या कालावधीत भ्रष्ट कर्मचार्यांवर कारवाई केलेल्यांची संख्या ५३३ आहे. वर्ष २०१४ मध्ये १ सहस्र २४५, तर २०१५ मध्ये १ सहस्र २३४ भ्रष्टाचार्यांवर कारवाई करण्यात आली. यंदाच्या वर्षी विभागाने केलेल्या कारवाईत महसूल विभागाचे १५६, पोलीस १५०, पंचायत समितीतील ७०, शिक्षण विभागातील ४७, पालिकेशी संबंधित ३० आणि अन्य विभागाचे ८० भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी लाच घेतांना पकडले गेले आहेत. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सर्वाधिक ९४ भ्रष्टाचार्यांवर कारवाई पुण्यामध्ये झाली आहे. त्याखालोखाल संभाजीनगर ८३, नागपूर ७३, नाशिक ७१, ठाणे ६०, अमरावती ५८, नांदेड ५३ आणि नंतर मुंबईचा ४१ क्रमांक लागतो.
Post a Comment