BREAKING NEWS

Friday, July 22, 2016

युवा शेतकऱ्याची गळफास लावुन आत्महत्या - बेसीक फायनान्सचे होते ३५ हजार रूपये कर्ज, बेसीक फायनान्सच्या कर्जाचा उईके ठरला तिसरा बळी

चांदूर रेल्वे / शहेजाद खान /--------
बेसीक कर्जाचा हप्ता भरणे अशक्य झाल्याने एका युवा शेतकऱ्याने  राहत्या घरी गळफास लावुन जिवनयात्रा संपविल्याची घटना गुरूवारी सकाळी ९ वाजता तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावी घडली. मनोज बेसीक फायनान्स कंपनीचा  कर्जापायी आत्महत्या करणारा तिसरा बळी ठरला. मनोज शामराव उईके (वय ३०) असे त्या दुर्दैवी युवा शेतकरी चे नाव आहे.
मृतक मनोज उईके कडे ३ एकर कोरडवाहू शेती असुन त्यामध्ये सोयाबीन पेरले .मनोज ने दोन बेसीक फायनान्स कंपन्याकडुन ३० हजाराचे कर्ज उचलेले होते. एकाचा हप्ता ७४० रूपये व दुसऱ्याचा पंधरा दिवसाने ५०० रूपये भरावा लागत होता. त्यामुळे घरचे वातावरण तंग होऊन पती-पत्नीमध्ये खटके उडत होते. अशातच मनोजची पत्नी माहेरी निघुन गेली. आठ दिवसापासुन तो घरी एकटाच राहत होता. आज सकाळी ८.३० वाजता स्थानिक बस स्टॉपवर त्याने नास्ता केल्याचे गावकरी सांगतात. त्यानंतर घरी परतला व राहत्या घरी आतल्या खोलीत मुलीच्या पाळण्याच्या दोरीने नाटेला बांधुन गळफास लावला. ही बाब बराच वेळाने त्याला भेटण्याकरीता आलेल्या मित्राच्या लक्षात आली. त्यांनी शेजारी राहणाऱ्या मोठ्या भावाला सांगीतले. मृतक मनोज उईके यांच्या पश्चात पत्नी, ६,४ व २ वर्षाच्या तीन मुली, वृध्द आई व मोठा भाऊ आहे. कुऱ्हा  पोलीसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून अधिक तपास करीत आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.