मुंबई- ’सैराट’सारख्या चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या विद्यमान आमदार मनीषा चौधरी यांनी केली होती या मागणीवर श्री नागराज मंजुळे यांनी असे म्हटले आहे कि
‘सैराट हा आता माझा भाग राहिलेला नाही. ज्यांना बंदी घालायची आहे त्यांनी घालावी. ज्यांना बघायचा आहे त्यांनी बघावा’, असे नागराज मंजुळे म्हणाले.
मनीषा चौधरी यांनी कोपर्डी बलात्काराच्या घटनेचा संबंध `सैराट’ चित्रपटाशी जोडून अशा चित्रपटांमुळे तरुण पिढी बिघडत असल्याचा जावईशोध लावला. यावर नागराज मंजुळेंना विचारले असता त्यांनी सैराट हा आता माझा भाग राहिलेला नसल्याचे सांगितले.
‘चित्रपटावर बंदी घालून जग सुधारले असते तर मग किती बदलले असते. त्यामुळे ज्यांनी हे वक्तव्य केले त्यांनी जरुर याचा विचार करावा तसेच ज्यांनी त्यांचे बोलणे ऐकले त्यांनीही यावर जरुर विचार करावा’, असे मंजुळे यावेळी म्हणाले.

Post a Comment