BREAKING NEWS

Friday, July 22, 2016

सनातनचा हिंसेवर विश्‍वास नाही ! - निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री सुधाकर चपळगावकर

संभाजीनगर -
 


 पंढरपूर वारी, गणेश विसर्जन मिरवणूक, रामनवमी मिरवणूक, कुंभमेळा, जगन्नाथ यात्रा, केदारनाथ यात्रा असे सोहळे ज्यामध्ये लक्षावधींच्या संख्येने हिंदु एकत्र येतात, त्याला पर्यावरण, आरोग्य, धान्य नासाडी अशा कारणांवरून विरोध करणार्‍या पुरोगामी, विवेकवादी संस्थांचे गुप्त उद्देश बाहेर काढण्यासाठी सनातन संस्थेच्या पाठीशी फार मोठ्या संख्येने अधिवक्त्यांची फौज, हिंदु विधिज्ञ परिषद यांसारख्या अनेक संस्थांच्या माध्यमातून उभी राहिली आहे. सनातनचा हिंसेवर विश्‍वास नाही म्हणूनच एवढ्या प्रचंड संख्येने अधिवक्ते सनातनच्या पाठीशी आहेत. सनातनवर होणार्‍या अन्यायाचा विरोध कायदेशीर मार्गाने करण्यासाठी अधिवक्ते कटीबद्ध आहेत, असे आश्‍वासक उद्गार निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री. सुधाकर चपळगावकर यांनी काढले. संभाजीनगर येथे पणजी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. हा कार्यक्रम रामायणा कल्चरल हॉलमध्ये झाला.
     अधिवक्ता श्री. चपळगावकर पुढे म्हणाले की, साधनेत मग्न असलेल्या साधकांना, सनातन पासून दूर करण्यासाठी अधून-मधून सनातनवर बंदी आणा, बंदी येणार अशी आवई उठवली जाते तसेच मागणीही केली जाते. दाभोळकरांच्या दोन्ही न्यासांमध्ये गुन्ह्यात बसू शकतील अशी प्रकरणे सनातनच्या साधकांनी माहितीच्या आधिकारात बाहेर काढून न्यासावर खटले दाखल केले. पंढरपूर, कोल्हापूर आणि तुळजापूर येथील देवस्थानाच्या स्थावर आणि जंगम मिळकतीची प्रकरणे माननीय उच्च न्यायालयात लावून धरण्यात येत आहेत. हिंदूंच्या सभा, मिरवणुका यांना शासकीय अधिकारी मनमानी करून अनुमती नाकारत आहेत. अशा वेळी उच्च न्यायालयात धाव घेऊन अनुमती मिळवून देण्यात आली. या वेळी त्यांनी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा काही भाग वाचून दाखवला. 
     या कार्यक्रमामध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री. सुधाकर चपळगांवकर यांच्या हस्ते शेंदुरवादा गावचे धर्माभिमानी श्री. गणेश नरवडे आणि श्री. सागर बाहुले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उच्च माध्यामिक परीक्षेत सुयश प्राप्त केलेली विद्यार्थी साधिका कु. प्रतिक्षा निकम आणि दैनिक सनातन प्रभातचे वितरक श्री. अनिल नाकिल यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचा लाभ २०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.