चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-
आपल्या देशाच्या एकूण भूमीपैकी केवळ ११ टक्के क्षेत्रच जंगलाने व्यापलेले आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जंगलतोडीमुळे जलवायू परिवर्तन घडून येत आहे. पर्यावरणातील या बदलांमुळेच भविष्यात देशातल्या काही भागांत पूरसदृश परिस्थिती आणि काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होईल,असा अंदाज काहींनी व्यक्त केला आहे. एकूणच जागतिक तापमानात सतत होणारी वाढ लक्षात घेता यासाठी आतापासूनच ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असतांना शासनाने वनमहोत्सव सप्ताहाचे आयोजन केले. यामध्येच स्थानिक नगरपरीषद आझाद उर्दु शाळेमध्ये वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न झाला.
उर्दु शाळेत संपन्न झालेल्या या वृक्षारोपन कार्यक्रमात स्वच्छता, आरोग्य तथा शिक्षण सभापती नितीन गवळी यांनी वृक्षारोपन केले. यावेळी बोलतांना नितीन गवळी म्हणाले की, वृक्ष माणसांमध्ये आनंद आणि उत्साहाची भावना निर्माण करतात. कार्यालयाच्या परिसरात लावलेली झाडे जेव्हा तिथले कर्मचारी पाहतात तेव्हा त्यांचा काम करण्याचा उत्साह वाढतो, कार्यक्षमता वाढते. झाडांकडे पाहण्यामुळे मनाला शांतता मिळते,मनावरचा तणाव कमी होतो. ज्या कार्यालयाच्या परिसरात अधिक झाडे लावलेली
असतात, तिथले कर्मचारी खेळकर स्वभावाचे असतात, अशातच जास्तीत जास्त नागरीकांनी नागरीकांनी वृक्षारोपन करावे असे आवाहन नितीन गवळींनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच काही पालकांनी ही शाळेत वृक्षारोपन केले..

Post a Comment