जळगाव -
हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण करणे, त्यांना हिंदूंच्या रक्षणासाठी, धर्मकार्यासाठी सिद्ध करण्यासाठी सनातन संस्था कार्यरत आहे. जो वाईट कृत्य करतो तो समाजात उघड माथ्याने फिरतो; पण जी सनातन संस्था सनदशीर मार्गाने सर्व करते तिच्यावर मात्र बंदीची मागणी होते, ही लज्जास्पद गोष्ट आहे. अंधश्रद्धा निर्मूलन संस्था ही अज्ञानी आणि निधर्मी आहे, हे तिच्या नावातून स्पष्ट होते. अशा संस्थेचा मी पूर्ण निषेध करतो. वारकरी संप्रदायाच्या वतीने आमचा सनातन संस्थेला पूर्ण पाठिंबा आहे, असे उद्गार ह.भ.प सौरभ महाराज यांनी काढले. जळगाव येथे महानगरपालिकेसमोर नुकत्याच आयोजित केलेल्या आंदोलनामध्ये ते बोलत होते.
जळगाव येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदु आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनाला १३० हून अधिक हिंदुत्ववादी उपस्थित होते. या वेळी चालणार नाही चालणार नाही सनातन संस्थेवर बंदी चालणार नाही, धिक्कार असो धिक्कार असो कैरानामध्ये हिंदूंवर अत्याचार करणार्या धर्मांधाचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाच्या माध्यमातून कैरानातून पलायन केलेल्या हिंदु कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली.

Post a Comment