BREAKING NEWS

Thursday, July 14, 2016

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे छायाचित्र शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात प्रदर्शित होणार

मुंबई /---
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे छायाचित्र शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात प्रदर्शित
करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने दि. 12 जुलै 2016 रोजी निर्गमित केला आहे . अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या मागणीच्या अनुषंगाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सलग दोन वर्षे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे .

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या भजनांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या विरोधात एल्गार पुकारत समाज जागृती  केली . समाजातील अनिष्ट प्रथा , अंधश्रद्धा आदी विरुद्ध त्यांनी नागरिकांना आपल्या ओघवत्या वाणीच्या माध्यमातून जागृत केले . ते एक चालते बोलते विद्यापीठ होते . त्यांच्या दिव्य विचारांचा अंगीकार व्हावा व त्यांचे कायम स्मरण व्हावे  म्हणून यांचे छायाचित्र शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात प्रदर्शित करण्याची मागणी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली . सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीच्या पूर्ततेसाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले असून या पुढे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे छायाचित्र शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात आपल्याला दिसणार आहे .

नागपूर विद्यापीठाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या माध्यमातून केलेला संसदीय संघर्ष नागरिकांच्या आजही स्मरणात आहे . त्यावेळी आनंदित गुरुदेव भक्तांनी गुरुकुंज आश्रम मोझरी येथील तुकडोजी महाराज यांच्या गादीवर बसवून त्यांचा सत्कार केला होता .

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.