BREAKING NEWS

Thursday, September 15, 2016

राजे छत्रपति मंडळाने दिला बेटी बचाव चा संदेश *विविध स्पर्धेचे सुध्दा आयोजन * मंडळाचे 5 वे वर्ष

चांदुर रेल्वे :-(शहेजाद  खान)


 
स्थानिक सरदार चौक, माळी पूरा  परिसरात राजे छत्रपती गणेश मंडळाच्या वतीने बसविण्यात आलेल्या गणपती मंडळाने यावर्षी बेटी बचाव बेटी पढ़ाव हा विषय आपल्या देखव्याचा घेतला असून बेटी बचाव चा सामाजिक संदेश ते समाजात देत आहे. त्यासाठी विविध स्पर्धेचेही त्यांनी आयोजन केले आहे.
     मंडळाचे हे पाचवे वर्ष असून मागील 4 वर्ष त्यांनी पानी बचत, सर्वधर्म समभाव, एकता, ऐतिहासिक वास्तुनचि सुरक्षा असे अनेक विषय आपल्या उत्सवातून साकारले होते. यावर्षी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणपती सजावट स्पर्धेतील बेटी बचाव हा विषय घेऊन आपल्या मंडळाचा देखावा साकारला आहे. या दरम्यान त्यांनी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भक्ति गीत स्पर्धा इत्यादिचे आयोजन केल्याची माहिती आहे.
गणपती उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी त्यांनी शासनाच्या सर्व अटि चे ही पूर्तता केल्याचे आमच्या प्रतिनीधीला सांगितले.
    मंडळाच्या आयोजीत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे विवेक राऊत, सुनील अग्रवाल, योगेश मालखेडे, राहुल कोरडे, मंगेश देशमुख, अतुल मोरे, चेतन चव्हाण, रूपेश मालखेडे,निखिल गायकवाड़, सूरज पवार, प्रीतम चव्हाण, धीरज चव्हाण, शुभम गायकवाड़, सागर बगेकर, गणेश गायकवाड़, बबलू बावनथडे,पवन जयसिंगपुरे, शुभम टेम्भे, शुभम कोरडे, सतीश बगेकर, वैभव अग्रवाल, रोहित तिजारे, हर्ष अग्रवाल, हरी शिंदे, पंकज नेरकर, अक्षय चव्हाण, कुमार देशमुख,प्रतिक मालखेडे, पवन पवार आदि परिश्रम घेत आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.