BREAKING NEWS

Thursday, September 15, 2016

चांदुर रेल्वे शहरात शांततेत ईद उल अजहा साजरी- हजारो मुस्लिम बांधवांकडून शांती- बंधूभावसाठी प्रार्थना ईदगाहवर ठाणेदार बोबडे यांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा.

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-

 
मुस्लीम बांधवांच्या महत्वातील एक सण म्हणजे ईद उल अजहा (बकरी ईद). अशातच मंगळवारी शहरात शांततेने व इतर धर्मिय बांधवांच्या भावनेचा आदर करून ईद उल अजहा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
       बकरी ईद यालाच 'ईद-उल्-जुहा' म्हटले जाते. परमश्रेष्ठ परमेश्वराच्या भक्तीमार्गात केल्या गेलेल्या अस्सीम त्यागाचे 'ईद-उल्-जुहा' हे प्रतीक आहे. अरबी महिन्याच्या 'जिल्हाज़' या महिन्यामध्ये हा सण मुस्लिम धर्मियांमध्ये अखिल विश्वात साजरा केला जातो.मुस्लिम धर्मात मुख्य पाच अनिवार्य कर्तव्ये आहेत यात परमेश्वर व त्याचे प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी श्रद्धा,नमाज, रोजा, जकात व हज यांचा समावेश आहे. त्यापैकी हज हे कर्तव्य ज्याची कुवत आहे अशांसाठी आहे. या कर्तव्यात मक्का येथे जाऊन 'खान-ए-काबा'चे दर्शन घेणे, तसेच अराफात
व मुजदलिफा या ऐतिहासिक ठिकाणांचे दर्शन घेणे यांचा समावेश यात आहे. याबरोबरच परमश्रेष्ठ अल्लाहच्या मार्गात बकरा, किंवा उंटाचे बलिदान देणे यांचा अंतर्भाव आहे. इस्लामचे आद्य प्रेषित हजरत इब्राहिम हे परमश्रेष्ठ अल्लाहचे
निस्सीम भक्त होते. अल्लाहच्या मार्गात त्यांनी
आपली सर्व संपत्ती व परिवाराचा त्याग केला.
त्या गोष्टीचे स्मरण सर्व मुस्लिम बांधवांच्या अंगी
बाणवण्याकरिता 'ईद-उल-जुहा'साजरी केली
जाते. अशातच रविवारी चंद्रदर्शन न झाल्याने सोमवारऐवजी मंगळवारी शहरात सर्वत्र बकरी ईद साजरी करण्यात आली. शहरात ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवांनी सकाळी ९ वाजता सामुहीक नमाज पठण केले. या वेळी शहरासह चांदुरवाडी, मांजरखेड, अमदोरी, धानोरा, सातेफळ, आदी गावांतील बहुसंख्य मुस्लिम बांधवानीही नमाज अदा केली. ईदगाहवर कारी शहेझाद यांनी नमाजचे पठण केले. नमाजपठण संपताच ईदगाहच्या मिंबरवर उभे राहून कारी शहेझाद यांनी अरबी भाषेतील ईदचा खुतबा वाचला.  नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी भारतासह संपूर्ण जगात शांती, सुख- समृद्धी राहो. भारतात राष्ट्रीय एकात्मता वाढून विकास होवो, अशी प्रार्थना केली.
      यानंतर सर्वांनी एकमेकांना गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. चांदुर रेल्वे शहर जातीय एकात्मता व प्रेमभाव बंधुत्वासाठी प्रसिध्द आहे. शहरामध्ये सर्वधर्मीय लोक आहे. शहरातील सर्व धर्मीय बांधवांसह ठाणेदार गिरीष बोबडे यांनीही मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आलीम अक्रम, हाफीज शौकत अली, हाफीज शकील,  ईदगाह कमेटीचे अध्यक्ष मेहमुद हुसैन, हाजी ईकबालभाई, हाजी फारूखभाई, हाजी रफीक जानवानी, हाजी अनीस जानवानी, शेख हसनभाई, जहीर काझी, अनीस सौदागर, सैय्यद जाकीरभाई, अफरोज अहेमद यांसह अनेक मुस्लीम बांधव उपस्थित होते. ईदगाहवर पोलीसांचा तगडा बंदोबस्त होता.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.