BREAKING NEWS

Thursday, September 15, 2016

न.प. मध्ये मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरातील कामे खोळंबली. - सभापती नितीन गवळी झाले आक्रमक. - तत्काळ नियुक्तीसाठी एसडीओंना दिले निवेदन

चांदुर रेल्वे-शहेजाद खान /--

 
चांदुर रेल्वे नगरपरीषदमधील वादग्रस्त मुख्याधिकारी यांची गेल्या पंधरा दिवसांपुर्वी बदली झाली असुन तेव्हापासुन मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरातील कामे खोळंबली आहे. यामुळे शिक्षण, आरोग्य सभापती नितीन गवळी आक्रमक झाले असुन तत्काळ नवीन मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे व याची दखल घेऊन याविषयी एसडीओंनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केल्याचे समजते.
        वादग्रस्त मुख्याधिकारी गिता ठाकरे यांच्या शहरातील जवळपास सहा महिन्यांच्या कार्यकाळात चांदुर रेल्वे नगर परीषद जिल्हाभर गाजली. त्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरवासी त्रस्त झाले होते. अखेर या वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांची पंधरा दिवसापुर्वी बदली झाली होती. स्थानिक नगरपरीषदमध्ये आयोजित त्यांच्या निरोप समारंभात शिक्षण व आरोग्य सभापती यांनी चक्क मुख्याधिकारी ठाकरे यांना बदली झालेल्या नगरपरीषदमध्ये नागरीकांशी बोलण्याची पद्धत बदलावी तसेच नागरीकांच्या व्यथा ऐकुन घ्यावा असा सल्ला देवुन कानपिचक्या घेतल्या होत्या. अशा वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीनंतर अद्यापही नवीन मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली  नाही. शासनाच्या १ सप्टेंबर २०१६ च्या परीपत्रकाप्रमाणे मुख्याधिकाऱ्यांचे पद रीक्त ठेवता येत नाही. तसेच रीक्त पद तत्काळ नायब तहसिलदाराांपेक्षा कमी नाही अशा अन्य महसुली अधिकाऱ्यांकडे किंवा नजिकच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सोपविणे गरजेचे आहे. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या रीक्त पदामुळे शहरातील शौचालयाचे धनादेश, फेरफार नोंदणी, विहीरीत  ब्लिचींग पावडर टाकणे, जन्म मृत्यु दाखला, मच्छर फवारणी तसेच इतर सुरू असलेली कामे पुर्णत: ठप्प पडली आहे. निर्माण झालेल्या या समस्यांमुळे सगळ्यात सक्रीय असणारे शिक्षण, आरोग्य सभापती आक्रमक झाले आहे. तत्काळ रीक्त असलेले मुख्याधिकारी पद भरण्यासाठी स्थानिक उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांची बुधवारी भेट घेतली. व याबाबतचे निवेदन देवुन मुख्याधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी केली. शहरातील वाढत्या समस्या पाहता मुख्याधिकारी यांनीही तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
     यावेळी नितीन गवळी यांच्यासह नगरसेवक मेहमुद हुसेन, सामाजिक कार्यकर्ते गौतम जवंजाळ, भीमरावजी खलाटे आदी शहरवासी उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.