हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना
सर्वधर्मसमभावाचा पुरस्कर्ता दाखवून हिंदु धर्मात फूट पाडण्याचा कुटील डाव जाणा !
- छत्रपती शिवाजी महाराजांना बौद्ध राजे ठरवण्याचा संतापजनक प्रकार
- निवेदन देऊनही अपप्रकार न रोखता पोलिसांनी धारकर्यांनाच स्थानबद्ध केले !
मुंबई-- - महाराष्ट्राचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी रायगडावरील त्यांच्या पुतळ्याला
२४ सप्टेंबर या दिवशी बौद्ध पद्धतीने राज्याभिषेक करून काही समाजकंटकांनी
महाराजांना बौद्ध राजा ठरवण्याचा संतापजनक प्रकार केला. या अपप्रकाराची
चाहूल लागताच तो रोखण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठानच्या अनुमाने ४००
धारकर्यांनी एकत्रित येऊन रायगड पोलिसांना निवेदन दिले. त्यानंतरही
पोलिसांनी हा अपप्रकार न रोखता शिवाजी महाराज यांच्याविषयी
सर्वधर्मसमभावाचा दाखला देत धारकर्यांनाच स्थानबद्ध केले. समाजात दुही निर्माण करणार्या या
अपप्रकाराच्या मागे संभाजी बिग्रेडचा हात असल्याचा संशय धारकर्यांनी
व्यक्त केला. हा अपप्रकार रोखण्यासाठी वेळी सर्वश्री मंगेशराव केणी, राजेश
सावंत, विठ्ठल भिसे, अजय बर्गे, स्वप्नील यादव, संकेत कंक, अशोक शिंदे,
चेतन बारस्कर, अनंत करमुसे, पराशर मोने, यश हिरवटे, घनश्याम गाडेकर, रोहित
आवले, परेश घोलप, सचिन जाधव, रोहित तांबे, विवेक सोनवणे, दीपक खामकर यांनी
पुढाकार घेतला.
१. ६०-७० समाजकंटकांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पुतळ्याला बौद्ध पद्धतीने राज्याभिषेक केला. तेथे शिवाजी महाराज यांनी
बौद्ध धर्माचा स्वीकार केला असल्याची काही प्रक्षोभक भाषणे करण्यात आली.
२. हा प्रकार रोखण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, सातारा, सांगली,
रायगड आणि पुणे येथील धारकर्यांनी एकत्रित येऊन पोलिसांना निवेदन दिले.
या वेळी धारकर्यांनी रायगडावर शिवछत्रपतींच्या चरणी लीन होण्यासाठी
कोणासही बंदी नाही; मात्र महाराजांना बौद्ध ठरवून दोन धर्मांमध्ये वाद
निर्माण करून दंगल घडवण्याचा कुटील डाव काही समाजकंटक करत आहेत, ही भूमिका
स्पष्ट करून समाजकंटकांवर कारवाईची मागणी पोलिसांकडे केली. पोलिसांनी मात्र
सुव्यवस्थेच्या नावाखाली हा अपप्रकार न रोखता शिवाजी महाराज कशा प्रकारे
सर्वधर्मसमभाव जपत होते, याचे दाखले देत समाजकंटकांचा कार्यक्रम चालू
दिला.
३. अपप्रकार रोखण्यासाठी निघालेल्या धारकर्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी १७
धारकर्यांना तात्पुरते स्थानबद्ध केले. समाजकंटकांच्या या कृत्याचा आणि
त्याला खतपाणी घालणार्या पोलिसांच्या भूमिकेविषयी सर्वत्रच्या
शिवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
४. राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर निळ्या आणि वेगवेगळे रंगांचे पट्टे
असलेले झेंडे फडकवण्यात आले. भगवे ध्वज आणि वारकरी टोपी घालून गडावर
जाणार्या धारकर्यांना मात्र पोलिसांनी रोखले.
Post a Comment