न्यूयॉर्क - जम्मू-काश्मीर
भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. पाकने काश्मीरचे स्वप्न पहाणे सोडून
द्यावे, असे सडेतोड उत्तर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी
संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेला संबोधित करतांना दिले. काही
दिवसांपूर्वी नवाज शरीफ यांनी येथे केलेल्या भाषणात काश्मीरवरून भारतावर
टीका केली होती.
सुषमा स्वराज यांनी मांडलेली सूत्रे
१. आपण आतंकवादाला रोखण्यात अपयशी ठरलो आहोत. आतंकवाद मानवाधिकारांचे सर्वांत मोठे उल्लंघन आहे.
२. आतंकवाद्यांना कोण आश्रय देतो, त्यांना कोण साहाय्य करतो हे जगजाहीर
आहे. ज्याने आतंकवादाचे बीज रोवले, यानेच त्याचे कटू फळ खाल्ले आहे.
३. ज्यांचे घर काचेचे असते, त्यांनी दुसर्यांच्या घरावर दगड फेकू नये.
४. आम्ही मैत्रीद्वारे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या बदल्यात
आम्हाला काय मिळाले ? पठाणकोट, उरी ? अटक करण्यात आलेला बहादुर अली हा
पाकमधून आला होता, हा त्याचा पुरावा आहे.
Post a Comment