BREAKING NEWS

Friday, September 23, 2016

सशस्त्र संशयितांना शोधण्यासाठी उरणमध्ये जोरदार शोधमोहीम

उरण - काश्मिरातील उरी लष्कर तळावर अतिरेक्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यापासून देशभरातील सुरक्षा यंत्रणा अतिसतर्क असतानाच उरण नौदल तळाजवळ ५ सशस्त्र संशयित शालेय विद्यार्थ्यांना दिसल्याने गुरुवारी मुंबई परिसरातील सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. हायअलर्ट जारी करीत संशयित अतिरेक्यांना शोधण्यासाठी नौदल, हवाई दल, केंद्रीय सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकांनी जोरदार शोधमोहीम सुरू करीत उरण परिसर पिंजून काढला. मात्र असे कोणतेही अतिरेकी अद्याप तरी हाती लागलेले नाहीत. काही संशयित कामगारांची मात्र चौकशी झाल्याचे समजते.
सुरुवातीस एनएसजी या सुरक्षा यंत्रणेच्या सरावाचा भाग असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, असा कोणताही सराव सदर सुरक्षा यंत्रणेकडून केला गेला नसल्याचे समजताच या संशयितांच्या शोधकार्याला गती देण्यात आली. संपूर्ण तपासात अद्याप  काहीच हाती लागले नसले तरी ज्या बंद इमारतीमध्ये अतिरेकी घुसल्याचे सांगितले जात होते तेथे संशयित ४ कामगारांची चौकशी करण्यात आली.   
याबाबत अधिक माहिती देण्यास सुरक्षा यंत्रणांनी नकार दिला.एका विद्यार्थिनीला शाळेत जाताना सकाळी ७ च्या सुमारास चार काळे पठाणी कपडे घातलेले बंदूकधारी, चेहरा झाकून गुप्तपद्धतीने वावरत असताना दिसले. अन्य एका विद्यार्थ्यालाही मोरा, बोरीनाका येथे असेच बंदूकधारी संशयित डोंगरावर जाताना दिसला. विद्यार्थिनीने मुख्याध्यापकास हा प्रकार सांगताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी नौदलाशीही संपर्क साधला. त्यानंतर तत्काळ नौदल, हवाईदल, मार्कोस, पोलीस तसेच केंद्रीय सुरक्षाबलाने संशयितांचा तपास सुरू केला. या शोधमोहिमेत हवाईदलाचे व नौदलाचे हेलिकॉप्टरदेखील उतरवण्यात आले.
५ सुरक्षा यंत्रणांचे जवळपास २०० पेक्षा जास्त जवान तपास कामात सहभागी झाल्यामुळे उरण शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दहशत पसरल्याने मुख्य बाजारपेठ बंद करण्यात आली होती. हेलिकॉप्टरच्या घिरट्या दिवसभर सुरू होत्या.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.