नगर -
कोपर्डी येथील
अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज अहमदनगर शहरात निघालेल्या मराठा क्रांती मूक
मोर्चाने आजवरच्या सर्व मोर्चांचे रेकॉर्ड ब्रेक करून नगरच्या इतिहासात
अभूतपूर्व घटनेची नोंद केली.
'एक मराठा, लाख मराठा' अशी भावना जागवीत सकल मराठा समाज एकवटला आणि लाख
असालो तरी आम्ही एकच आहोत, असा संदेश देत मूकमोर्चाच्या माध्यमातून
अन्यायाचा नि:शब्द निषेध नोंदविला. अहमदनगर शहरात मराठा शक्तीचा महासागर
दिसून आला. आयोजकांनी या क्रांती मोर्चात २० ते २५ लाख मराठा समाजबांधव
सहभागी झाल्याचा दावा केला आहे.
मोर्चामध्ये अभूतपूर्व शिस्त पाहायला मिळाली. त्यामुळे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना कुठलाही त्रास झाला नाही. वाडियापार्क येथे मराठा बांधव एकवटत असताना वारंवार माईकवरुन आचारसंहितेचे पालन करण्याच्या सुचना करण्यात येत होत्या. तसेच कुणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी स्वयंसेवकांनीही सुचना देण्यात आल्या. महिलांच्या सुरक्षितेवरही मोर्चादरम्यान विशेष लक्ष देण्यात आले. राज्यभर निघालेल्या शिस्तबध्द मोर्चांचा आदर्श अहमदनगरमध्ये चरणसिमेवर पोहचून नवा आदर्श निर्माण करण्याकरिता कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्याने अत्यंत शांततेत आणि अभूतपूर्व शिस्तीत हा मोर्चा पार पडला.
निवेदन देताना जिजाउंचा लेकी |
Post a Comment