अधिवेशनाच्या दुसर्या सत्रातील मान्यवरांचे विचार
हिंदु धर्माचे कार्य करतांना हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचेे सहकार्य
आवश्यक ! - अधिवक्ता गोविंद तिवारी, हिंदु महासभा, राज्य संघटक
जळगाव - हिंदूंचे संघटन असणे काळाची आवश्यकता आहे. हे संघटन
आपण कायद्याच्या चौकटीत राहूनच केले पाहिजे. हिंदूंच्या सणांच्या वेळी
आपल्याला पोलिसांचा विरोध होतो. दुर्गामाता दौडीला मला माझ्या
कार्यकर्त्यांना १४९ नोटीस आणि चौकशीला बोलावले होते. त्या वेळी
हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांच्या माध्यमांतून आम्ही त्यांना तोंड दिले. वर्ष
१९७० मध्ये जळगाव येथील तांबापुरा भागात झालेल्या दंगलीतही धर्मांधावर अनेक
प्रकारचे गुन्हे प्रविष्ट झाले होते. त्या तुलनेत हिंदूवर अल्प प्रमाणात
गुन्हे प्रविष्ट होते. त्यामुळे हिंदु धर्माचे कार्य करतांना हिंदुत्वनिष्ठ
अधिवक्त्यांचेे सहकार्य घ्यायला हवे.
काश्मीर विषयावर राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याची आवश्यकता !
- श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
आज काश्मिरची स्थिती ही प्रतिदिन अत्यंत कठीण होत आहे. काश्मीरमधील
हिंदूंना वर्ष १९९० मध्ये तेथून निघून जावे लागल्याने आता तेथे उरलेल्या
बहुसंख्य फुटीरतावाद्यांची मानसिकता काश्मिरचे पाकिस्तानात विलीनीकरण
व्हावे, अशीच आहे. तेथील लहान मुलेही आपल्या सैनिकांवर आक्रमण करत आहेत.
काश्मीरमध्ये आतंकवादी बुरहान वाणीच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत आपले
सहस्रो सैनिक घायाळ झाले. आपण वेळीच काश्मीरचा विषय गांभीर्याने घेतला
नाही, तर आतंकवादी उरला सुरला काश्मीरही गिळंकृत करतीत. त्यामुळे काश्मीर
विषयावर राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याची आवश्यकता आहे.
७८ गणेशमंडळांना संघटित करण्याच्या माध्यमातून प्रबोधन शक्य !
- डॉ. नरेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समिती समन्वयक, नंदुरबार
नंदुरबार शहरातील प्रशासनाची मोगलाई मोडीत काढण्यासाठी शहरातील ७८
गणेशमंडळांचे एकत्रीकरण करून, गणेशोत्सव महामंडळ स्थापन करून त्या
माध्यमातून प्रशासनाला गणेशमंडळांच्या अनुमती एकाच ठिकाणी एक खिडकी
योजनेतून देण्यास भाग पाडले. शांतता कमिटीच्या बैठकांमध्ये इतर धर्मियांना
बोलावून हिंदूंच्या सणांच्या संदर्भात डोस पाजले जातात. अन्य धर्मियांकडून
होणार्या हिंदु धर्म आणि गणेशमंडळांचा होणारा अवमान रोखण्यासाठी
प्रशासनाला गणेशमंडळांची स्वतंत्र बैठक घेण्यास भाग पाडले. गणेशमूर्ती
विसर्जनात होणारी गणेशमूर्तींची विटंबना प्रशासनास वेळीच लक्षात आणून देऊन
मोठ्या जलाशयात विसर्जन करण्यास भाग पाडले, हे सर्व संघटितपणामुळे झाले.
सार्वजनिक उत्सव महामंडळाच्या माध्यमांतून अन्य उत्सवांच्या वेळीही असे
संघटितपणे कार्य करण्याचा मंडळांनी निर्धार केला.
सध्याच्या पिढीची पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाकडे वाटचाल !
- ह.भ.प. सौरभ पाटील महाराज, जळगाव
आज पाश्चात्त्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे आजची पिढी सात्त्विक आहार
सोडून पिझ्झा, बर्गर या आहारांकडे तर, सात्त्विक पोशाख सोडून
पाश्चिमात्यांप्रमाणे वेशभूषा करत आहे. स्वामी विवेकानंद यांनी
पाश्चात्त्य संस्कृती पायातील बुटांप्रमाणे, तर हिंदु संस्कृती ही
डोक्यावरील पगडीप्रमाणे आहे, असे म्हटले होते.
माहिती अधिकाराच्या कायद्याचा सुयोग्य वापर आवश्यक !
- दीपककुमार गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते
धर्मकार्य करतांना कायदेशीर मार्गाने लढा देत असतांना त्या
माहितीच्या अधिकाराचा उपयोग शस्त्राप्रमाणे होऊ शकतो. माहितीचा अधिकाराचा
उपयोग करत असतांना साध्या कागदावरही आपण माहिती मागवू शकतो. माहितीच्या
अधिकाराचा योग्य वापर करून मशिदींवरील अवैध भोंगे, अवैध पशूवधगृहे बंद करू
शकतो.
कायद्याच्या कलमांचा योग्य वापर करायला हवा !
- अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य हिंदु विधीज्ञ परिषद
गोरक्षणाच्या संदर्भात पोलीस हिंदूंची नेहमीच गळचेपी करतात.
कायद्याच्या कलमांचा योग्य वापर केल्यास सनदशीर मार्गाने गोरक्षण प्रभावी
होऊ शकते. अनेक अल्पवयीन मुली लव्ह जिहादच्या प्रकरणात अडकतात, तेव्हा आपण
आग्रही भूमिका घेऊन गुन्हा नोंद करू शकतो.
१ मार्च २०१५ या दिवशी महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा लागू
झाला; परंतु हा कायदा पूर्णपणे सक्षम नाही आणि इतर राज्यांमध्येही हा कायदा
अर्धवट स्वरूपात आहे.
- अधिवक्ता रूपाली भोकरीकर सह सचिव, जिल्हा बार असोशिअन, जळगाव
Post a Comment