घोषणा देतांना डावीकडून अधिवक्ता गोविंद तिवारी,
अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, पू. नंदकुमार जाधव,
ह.भ.प. विक्रम महाराज आणि श्री. सुनील घनवट
|
सनातन संस्थेचे श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना
पुरोगाम्यांच्या दबावाखाली फसवले गेले असून या दोघांचीही १०१ टक्के
निर्दोष मुक्तता होणार, असे प्रतिपादन पाळधी (जळगाव) येथील ह.भ.प. विक्रम
महाराज यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात
आलेल्या दोन दिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशनाच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत
होते. अधिवेशनाला उपस्थित जळगाव, धुळे आणि नंदूरबार येथील
हिंदुत्वनिष्ठांनी सनातन संस्थेला भक्कम पाठिंबा दर्शवला तसेच या प्रसंगी
सर्व हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या आम्ही सारे सनातन..
सनातन..सनातनच्या घोषणेने सभागृह दणाणून गेले. समारोपीय कार्यक्रमाला हिंदू
महासभेचे राज्य संघटक अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी, हिंदु विधीज्ञ
परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी, हिंदु जनजागृती
समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि सनातन संस्थेचे पू.
नंदकुमार जाधव यांनी उद्बोधन केले.
सनातनवर बंदी घातल्यास वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरून त्याला विरोध करणार !
- ह.भ.प. विक्रम महाराज
मी वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी असून सनातन संस्थेवर जर बंदी आली,
तर वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरून त्याला विरोध करेल. सनातन ही
धर्मप्रसार करणारी संस्था असून ज्यांना सनातन कळेल, त्यांना धर्म कळू शकेल.
सनातनचे साधक अंतःकरणापासून साधना म्हणून हे धर्मप्रसाराचे कार्य करत
आहेत. त्यामुळे प्रत्येक हिंदूने त्यांच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक आहे.
शासनाने साम्यवादी आणि पुरोगामी यांच्या दबावाला बळी पडू नये ! - अधिवक्ता गोविंद तिवारी
दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांचा मृत्यू यांच्या हत्येचा आरोप करून
सनातनसारख्या चांगल्या आणि नावलौकिक असलेल्या संस्थेची अपकीर्ती करणे, हे
अत्यंत चुकीचे आहे. शासनाने साम्यवादी आणि पुरोगामी यांच्या दबावाला बळी
पडू नये आणि सनातनसारख्या संस्थेला त्रास देऊ नये.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांना नष्ट करण्याचे षड्यंत्र सनातन हाणून पाडणार ! - पू. नंदकुमार जाधव
श्री. समीर गायकवाड यांना अटक करून १ वर्ष झाले; पण सबळ
पुराव्याअभावी समीर यांच्या विरोधातील खटला प्रलंबित ठेवण्याचा पोलिसांचा
प्रयत्न चालू आहे. त्यामुळे समीर यांच्यावर अन्यायच होत आहे. आतापर्यंत
सनातनच्या अनेक साधकांना खोट्या खटल्यात अडकवण्यात आले, त्यांचा छळ करण्यात
आला; पण त्यातून सनातनचे साधक निर्दोेष मुक्त झाले. पोलीस आणि काही
पुरोगामी प्रसारमाध्यमे हेतूपुरस्सर सनातनची अपकीर्ती करत आहेत. आज सनातन
जात्यात आहे, तर अन्य हिंदुत्ववादी संघटना सुपात आहेत. हे हिंदुत्वनिष्ठ
संघटनांना नष्ट करण्याचे षड्यंत्र आहे. याविरोधात सनातन संस्था लढा चालूच
ठेवणार असून हे षड्यंत्र हाणून पाडणार.
रमजानमध्ये धर्मांधांना पकडण्यास टाळटाळ करणार्या पोलीस प्रशासनाने ऐन
गणेशचतुर्थीच्या दिवशी सनातनच्या आश्रमात धाड घालणे निषेधार्ह ! - अधिवक्ता सुरेश कुलकर्णी
एरव्ही रमजानचा मास चालू असल्याचे कारण देत पोलीस प्रशासन
धर्मांधांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करतेे; पण त्याच पोलीस प्रशासनाने ऐन
गणेशचतुर्थीच्या दिवशीच सनातनच्या आश्रमावर विनाकारण धाड टाकली. तेथील
महिला, वयोवृद्ध, आजारी साधक यांना त्यामुळे नाहक त्रास झाला. पोलीस
प्रशासनाची ही कारवाई निषेधार्ह आहे. डॉ. तावडे यांच्या विरोधात कुठलाही
भक्कम पुरावा नसतांना त्यांच्या विरोधात पोलिसांनी खोटा खटला प्रविष्ट केला
आहे.
Post a Comment