३ कोटीच्या रस्त्याला ९ महिण्यात पडले खड्डे- अपुरी कामे, गती रोधकांना रेडियम पट्टे नाहीत
Posted by
vidarbha
on
2:30:00 PM
in
|
चांदूर रेल्वेः /शहेजाद खान
|
१.रस्त्यावर टाकलेला मुरूम |
|
२.गती रोधकांना पांढरे पट्टे मारलेले नाही |
|
३.डांगरीपुऱ्यातील नाला बांधकाम अर्धवट |
शहरातील रेल्वे स्थानक ते स्मशानभूमी अमरावती रस्त्याचे रूंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण व सौद्यीकरण ३ वर्ष ९ महिण्यापूर्वी १.३२ कोटी रूपये खर्चून करण्यात आले. अतिशय चांगल्या स्थितीत असलेल्या या रस्त्यावर ९ महिण्यापूर्वी पुन्हा ३ कोटी रूपये खर्चण्यात आले हे विशेष. सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असुन रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रूपये खड्यात गेल्याचे चित्र आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत विर हनुमान कन्स्ट्रक्शन कंपनीने ९ महिण्यापूर्वी चांदूर शहरात रेल्वे फाटक ते स्मशानभूमी अमरावती रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम केले. स्थानिक डांगरीपुऱ्यातील अमरावती रस्त्यावर एका बाजुने नाला बांधकाम व रेल्वे स्टेशन ते रेल्वे क्रॉसींग पर्यंत एका बाजुने नाली बांधकामाचा समावेश होता.या कामासाठी तीन कोटी रूपयाची मंजुरी २०१४-१५ च्या राज्याच्या बजेटमधुन करण्यात आली होती व या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री प्रविण पोटे व आमदार जगताप यांच्या उपस्थित थाटात पार पडले होते. परंतु सदर कामे करतांना कंत्राटदाराने इस्टीमेट व गुणवत्ता गुंडाळून ठेवली. वंâत्राटदाराने काम करतांना डांगरीपुऱ्यातील नाला अर्धवट बांधून पुढे जुन्या खचलेल्या छोट्या नालीला जोडुन दिली. प्रत्यक्षात इस्टीमेंटमध्ये नाला अमरावती रस्त्यावरील मोठ्या नाल्याला जोडणे गरजेचे होते. तसेच रेल्वे स्टेशन ते रेल्वे क्राँसींग पर्यंत रेल्वे क्वॉर्टरच्या बाजुने खचलेल्या जुन्या नालीवर कंत्राटदाराने पाट्या लावुन नाली बांधली. तेही नाली बांधकाम पूर्ण काम केलेले नाही. याबाबत उपविभागीय अभियंत्याला नागरिकांनी जाब विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. ऐवढचे नव्हे तर डांगरीपुऱ्यातील सुभाष चौकात टाकलेल्या गती रोधकावर रेडीयमचे पट्टे मारण्यात आलेले नाही. त्यामूळे अनेकांचे दररोज अपघात होत आहे. तसेच विरूळ चौकात जी.आर.भुत पेट्रोल पंपाजवळ तसेच पंचायत समिती जवळील गती रोधकांना रेडियमचे पट्टे मारलेले नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. कोर्टासमोरील रस्ता सहा महिण्यापूर्वी पाईप लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आला होता. पाईप लाईन टाकुन हा भाग तसाच थातुर मातून दाबण्यात आला. त्यामूळे या रस्ताचा भाग उखडला. त्यावर कंत्राटदाराने मुरूम टाकून लेवलाव केल्याचे स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे ३ वर्ष ९ महिण्यापूर्वी १.३२ कोटी रूपयात या रस्त्याचे रूंदीकरण, मजबुतीकरण व सौदर्यीकरण व डांबरीकरण तसेच रस्त्यावर दुभाजक बसवुन हायमॉक्य स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम झाले होते. त्याच रस्त्यावर तीन वर्षानंतर तिप्पट रक्कम ओतण्यात आली ही गोष्ट जरा न पचनारी आहे. तब्बल ३ कोटी रूपयाचे सदर कामे निकृष्ट दर्जाचे व थातुरमातून करण्यात आलेले आहे. त्यामूळे सा.बां.विभाग, कंत्राटदार व लोक प्रतिनिधीने जनतेच्या श्रमाच्या पैशावर डल्ला मारल्याची चर्चा जनमाणसात सुरू आहे.
Post a Comment