चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
श्री नितीन गवळी निरोप समारंभात बोलताना. |
वादग्रस्त मुख्याधिकारी गिता ठाकरे यांच्या शहरातील जवळपास सहा महिन्यांच्या कार्यकाळात चांदुर रेल्वे नगर परीषद जिल्हाभर गाजली. त्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरवासी त्रस्त झाले होते. अखेर या वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली असुन स्थानिक नगरपरीषदमध्ये आयोजित निरोप समारंभात शिक्षण व आरोग्य सभापती यांनी चक्क मुख्याधिकाऱ्यांना बदली झालेल्या नगरपरीषदमध्ये नागरीकांशी बोलण्याची पद्धत बदलावी तसेच नागरीकांच्या व्यथा ऐकुन घ्यावा असा सल्ला दिला.
गेल्या सहा महिन्यांपुर्वी चांदुरच्या नगरपरीषद मुख्याधिकारी म्हणुन गिता ठाकरे रूजु झाल्या होत्या. त्या येताच त्यांनी मनमानी कारभार सुरू केला होता. तसेच सामान्यांना रहिवासी दाखले देण्यास सुध्दा टाळाटाळ करीत होत्या. यावरून सत्ताधारी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांविरोधात ठिय्या आंदोलन सुध्दा केले होते. तसेच मुख्याधिकारी ठाकरे अनेकदा कार्यालयीन वेळेत बेपत्ता असायच्या. सामान्य माणुस चांदूर रेल्वे नगरपालीकेत मुख्याधिकारी यांच्याकडे गेले तर त्यांना नियमाची भाषा सांगीतल्या जाते. प्रत्यक्षात नियम सांगणारे अधिकारी मात्र चक्क कार्यालयीन वेळेत चाट मारत होते. शासन सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी त्यांना गल्लेलठ्ठ पगार देतो. मात्र निगरगट्ट अधिकारी जनतेच्या घामाचा पैसा व कार्यालयीन कामात निष्काळजीपणा दाखवुन बहुमोल वेळ वाया घालवित होते. तसेच घरकुल घोटाळ्याच्या चोकशीतही त्यांची भुमीका संशयास्पद होती. अशा वादग्रस्त मुख्याधिकारी गिता ठाकरे यांना सत्ताधाऱ्यांच्या मेहेरबानीने नुकतेच प्रशिक्षणासाठी नागरीकांच्या घामाचे ३ लाख रूपये देण्यात आले होते. मात्र या प्रशिक्षणाचा चांदुर रेल्वे शहरासाठी कोणताही उपयोग न होता त्यांची अखेर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या आदेशान्वये रीक्त असलेल्या जागेवर आकोट नगरपरीषदेत बदली करण्यात आली. त्यामुळे स्थानिक नगरपरीषदमध्ये निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मंचावर नगराध्यक्ष अभिजीत सराड, शिक्षण व आरोग्य सभापती नितीन गवळी व मुख्याधिकारी गिता ठाकरे उपस्थित होते. निरोप समारंभात जास्तीत जास्त लोक हे स्तुतीच करतांना दिसतात. मात्र या निरोप समारंभ भाषणात नितीन गवळी यांनी मुख्याधिकाऱ्यांना सल्लाच दिल्ला. यावेळी बोलतांना नितीन गवळी म्हणाले की, मॅडम तुमची प्रशासनात चांगली वचक आहे मात्र आपल्या व्यथा घेवुन आलेल्या नागरीकांशी चांगले बोलायला पाहिजे होते. तुम्ही नागरीकांवर थेट बोट दाखवुन राग काढतात. हा राग तुमच्यासाठीही घातकच आहे. कारण अनेक लोक तुमच्या विरोधात गेले. त्यामुळे बदली झालेल्या नगरपरीषदमध्ये तरी शहरवासीयांशी बोलण्याची पध्दत बदलवावी जेणे करून तुम्हाला नागरीकांच्या विरोधाला सामोरे नाही जावे लागेल असा सल्ला दिला. मात्र हा सल्ला होता की थेट मुख्याधिकाऱ्यांना टोला हा ही एक प्रश्न उपस्थीत झाला आहे. यावेळी नगरपरीषदेतील नगरसेवक, अधिकारी, कर्मचारीवृंद प्रामुख्याने उपस्थीत होते. सध्या स्थानिक नगरपरीषदेमध्ये नवीन मुख्याधिकारी रूजु झालेले नसुन जागा रीक्त आहे.
Post a Comment