नागपूर- 2015-16 मध्ये सहकार क्षेत्रात उत्कृष्ट
काम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरव करण्यासाठी शासनाने
गतवर्षीप्रमाणे ‘सहकार पुरस्कार’ देण्याचे ठरविले आहे. तरी इच्छुक संस्थांनी
त्यानुसार सविस्तर प्रस्ताव तयार करुन या तालुक्यात त्यांचे मुख्यालय आहे त्या
तालुक्यांचे संबंधित सहाय्यक निबंधक, उपनिबंधक यांच्या कार्यालयात दिनांक 7
ऑक्टोबर 2016 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी संस्थांनी संबंधित सहाय्यक
निबंधक, उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा,
असे आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात आले आहे.
Post a Comment