प.पू. आबा उपाध्ये यांचे पंतप्रधानांना अनावृत्त पत्र !
प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये |
भारताचे पंतप्रधान सन्मानीय श्री. नरेंद्र मोदी यांचा गेल्या मासात मन
की बात हा कार्यक्रम झाला. त्याअगोदर त्यांनी जनतेला आवाहन करून त्यांना
त्यांच्याशी लेखी किंवा प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी दिली. त्यात
त्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी या भाषांचीही सवलत दिली. याविषयी आम्हा
कुटुंबियांकडून धन्यवाद ! यासंदर्भात आम्हास काय वाटते, ते येथे देत आहोत.
सध्या भारतात दरोडेखोर, आतंकवादी आणि बलात्कारी हे प्रथमदर्शनी समोर
येतात. त्यावर उपाय म्हणजे शासनाने गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली, तरच
गुन्हेगारांना सरकारचा धाक वाटेल.
१. भारत हा योद्धा देश आहे. तो कमकुवत नाही. भारतात छत्रपती शिवाजी महाराज,
त्यानंतर वर्ष १८५७ च्या युद्धातील वीर माता झाशीची राणी आणि पुढील
कालखंडात अनेक क्रांतीवीर झाले. या क्रांतीविरांनी ब्रिटिशांना निष्प्रभ
केल्यामुळे भारत स्वतंत्र झाला; पण नंतरच्या लोकांनी या योद्ध्यांच्या
जिवावर आपली टिमकी मिरवून स्वातंत्र्याचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न
केला. हा प्रयत्न निष्फळ ठरून श्री. मोदी आणि शिवसेना यांनाच खर्या
अर्थाने यश मिळाले आहे. त्यांनीच खर्या अर्थाने योद्ध्यांच्या आत्म्याला
शांती दिली.
२. गुन्हेगारांना शासनाने वेळीच कठोर शिक्षा दिली, तरच पुढील वर्षाच्या आत
गुन्हे अल्प होतील. गुन्हेगारांवर होणार्या खर्चाचा आर्थिक बोजा आपोआपच
न्यून होईल. जी राष्ट्रे गुन्हेगारांना कठोर शिक्षा देत आहेत, ती राष्ट्रे
सुखी आहेत.
पंतप्रधानजी, हे लिहिण्याची संधी दिल्यामुळे आम्ही तुमच्याशी संवाद
साधू शकलो. त्यासाठी तुम्हास त्रिवार वंदन आणि त्रिवार धन्यवाद ! आपणांस
आणि आपल्या सहकार्यास परमेश्वर आयुरारोग्य, मन:स्वास्थ्य आणि मन:शांती
देवो, ही इच्छा !
जय हिंद । जय अखंड भारत ।
आपले,
(प.पू.) आबा उपाध्ये, (पू.) सौ. मंगला उपाध्ये आणि कुटुंबीय, पुणे.
Post a Comment