BREAKING NEWS

Saturday, September 3, 2016

सजीव मूर्तीचे दान घेण्याचा अधिकार पुरोगाम्यांना आहे का ? - श्री रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

कोल्हापूर - भारतीय संस्कृती आणि कायदा पूजा केलेली मूर्ती सजीव (जिवंत) आहे, असे मानतो. त्यामुळे कोणत्याही देवस्थानातील विश्‍वस्त हे देवतेच्या वतीने कारभार करतात. अशा प्रकारे जिवंत मानल्या गेलेल्या मूर्तीचे दान घेण्याचा अधिकार पुरोगाम्यांना आहे का ? त्याचसमवेत साक्षात् जिवंत म्हणून पूजा केलेल्या आणि ज्याच्याशी हिंदूंच्या भावना निगडित आहेत, अशा श्रीगणेशमूर्तींना पर्यावरणवादी अन् इतर कचर्‍याच्या गाडीतून नेऊन टाकतात, हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. श्रीगणेशमूर्तीच्या माध्यमातून होणारे प्रदूषण हे नगण्य असून केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांचा आनंद हिरावून घेण्यासाठी चालणारे श्रीगणेशमूर्तीदानासारखे प्रकार बंद झाले पाहिजेत, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाहू स्मारक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
     या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, युवासेनेचे जिल्हा समन्वयक श्री. रणजित आयरेकर, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे उपस्थित होते.
या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी मांडलेली अन्य सूत्रे...
 १. एकीकडे पुरोगामी हे देवाचे अस्तित्वच मान्य करत नाहीत आणि दुसरीकडे ज्याचे अस्तित्वच मान्य नाही, त्याचे दानही मागतात, हा दुतोंडीपणा नव्हे काय ?
२. गणेशोत्सवामुळे होणारे प्रदूषण एक प्रतिशतही नसतांना लोकांच्या मनात प्रदूषणाच्या नावाखाली भीती पसरवून त्यांचा उत्सव साजरा करून घेण्यातील आनंद हिरावून घेण्यात येत आहे.
३. केवळ मुंबईतील देवनार पशूवधगृहात बकरी ईदला कत्तलीतून ३० लक्ष लिटर प्रदूषित पाणी निर्माण होते, तर महाराष्ट्रात किती प्रदूषित पाणी निर्माण होत असेल ? असे असतांना त्यावर कोणी काहीच न बोलता केवळ गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणार्‍या प्रदूषणावर बोलतात, हे अत्यंत चुकीचे आहे. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने मशिदींवरील अवैध भोंग्यांच्या संदर्भात निकाल दिला आहे. या निकालाची कार्यवाही कोण करणार ? पोलीस प्रशासनाने आतापर्यंत किती अवैध भोंगे असणार्‍या मशिदींना नोटिसा दिल्या ?
४. मुळात हिंदूचे सण हे पर्यावरणपूक आहेत. आम्ही निसर्गाला देव मानतो त्यामुळेच आम्ही सागराची पूजा करतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न होण्यासाठी हिंदु धर्मीय उलट अधिक जागरूक आहेत.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.