अमरावती - (शहेजाद खान)-
भारत देशात अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज आहे परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. याच एकतेचे उदाहरण आज अमरावतीमध्ये पहायला मिळाले.
मराठा क्रांती महामोर्चाच्या निमित्ताने आज लाखो मराठा कार्यकर्ते सकाळपासून अमरावतीत आले होते. मोर्चात पायी चालताना लागलेली तहान भागविण्याचे काम शहरातील मुस्लीमांनी मोफत पाणी वाटप करुन
भागविली. मोर्चा कॉटन मार्केट चौकात आला त्यावेळी तेथेही मुस्लीम समाजा कडून पाणी व बिस्कीट चे वाटप करण्यात आले सकाळी ११.३० ला निघालेला हा मोर्चा शहरातील
मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करीत जेंव्हा गर्ल हायस्कुल चौक येथे पोहचला त्यावेळी दुपारचे दोन वाजले होते. अश्यातच मोर्चातील मोर्चेकरांसाठी शहरातील मुस्लिम बांधवानी थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. प्रत्येक मोर्चेकराला थंडगार पाणी मुस्लिम बांधव देत होते. आयोजकांकडून तर प्रत्येक चौकात
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तर होती मात्र हि मुस्लिम बांधवानी केलेली व्यवस्था पाहून सारेच
भारावून गेले. मराठा मोर्चाला सर्व जाती बरोबर सर्व धर्मियांकडून मिळालेली ही साथ हेच अमरावतीच्या मोर्चाच वैशिष्ठ ठरलं.
Post a Comment