चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /------
मस्तीखोर व बेधुंद तरूणांच्या वेगवान व निष्काळजीपणे मोटरसायकल चालविणे तेरा वर्षाचा साक्षीच्या जिवावर चांगलेच बेतले. आपल्या मुलांना शाळेत पोहोचविणाऱ्या शिरजगावच्या एका शेतकऱ्यांचा दुचाकीला या तरूणांनी जोरदार धडक दिली. त्यात १३ वर्षाची साक्षी गंभीर जखमी झाली असुन डोळा, चेहरा व पाय फॅक्चर झाले आहे. एक महिण्या पासुन साक्षीवर अमरावतीच्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. कारण नसतांना चिमुकली या बेधुंद तरूणाच्या निष्काळजीपणे वाहन चालविण्याची शिक्षा भोगत आहे.
२७ ऑगष्टच्या सकाळी नेहमीप्रमाणे शिरजगाव कोरडे येथील राजेश विष्णु बनसोड तेरा वर्षाची साक्षी व सहा वर्षाचा अथर्व यांना चांदूर रेल्वे येथील शाळेमध्ये सोडुन देण्यासाठी निघाले. चांदूर रेल्वे कडे जातांना वाटेत तुळजापुर गेल्यावर चांदूर रेल्वे कडुन भरधाव वेगाने येणाऱ्या मोटर सायकलने (एमएच२७ बीएम ०९१३) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेने साक्षी बनसोड खाली फेकल्या जावुन तिच्या चेहऱ्याचा उजव्या भागाला जबर मार बसला. डोळ्याला गंभीर इजा झाली व ओठ चिरले. लहानशा अथर्व व वडिल राजेश बनसोड यांच्या उजव्या पायाला जबर मार लागला. धडक दिल्यानंतर बनसोड परिवार गंभीर अवस्थेत पडलेला असतांना त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्याऐवजी अपघात करणारे योगेश घनशाम पनपालीया (वय २५), जयेश दिलीप काळबांडे (वय २३) व संकेत दिलीप कोरडे (वय २५) रा.शिरजगाव कोरडे या तिघा तरूणांनी त्यांना मरणासन्न अवस्थेत सोडुन पळुन गेले. त्यांचे दैव बलवत्तर होते. थोड्या वेळाने त्याच रस्त्याने आलेल्या स्कुल बसने त्यांना त्वरीत चांदूर रेल्वेच्या खाजगी दवाखान्यात भरती केले. साक्षीची गंभीर स्थिती पाहतांना राजेश बनसोड यांनी तीला त्वरीत अमरावतीच्या खाजगी दवाखान्यात हलविले. साक्षीच्या डोळ्याला सात टाके पडले असुन अजुनही साक्षी त्या डोळ्याने पाहू शकेल की नाही याची शक्यता कमी आहे. तिच्या चेहऱ्याचा उजवा भागावर अपघाताने मोठ्या गंभीर जखमा झाल्या आहेत. उजवा पाय फ्रक्चर आहे. या अपघातात चिमुकलीचा काय दोष होता. हसत-खेळत शाळेत जाणारी साक्षी एक महिण्यापासुन या मरण यातणा भोगत आहे. अपघात करणारे तरूण बनसोड कुटूंबांना मदती ऐवजी पोलीसात तक्रार का केली ? म्हणुन जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. सततच्या नापिकीमुळे पिंजलेले गरीब शेतकरी राजेश बनसोड साक्षीला या यातनेतुन बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहे.
या अपघातात साक्षीचा चेहरा रक्तबंबाळ व उजव्या डोळ्यातुन रक्त वाहत होते. अशा गंभीर अवस्थेतील साक्षीवर अमरावतीच्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. कोणताही दोष नसतांना माझी चिमुकली या बे-जबाबदार, बेधुंदपणे मोटरसायकल चालविणाऱ्या तरूणांच्या कर्माची फळे भोगत आहे. अशा तरूणांना कडक शासन झाले पाहिजे अशा भावना राजेश बनसोड यांनी व्यक्त केल्या.
Post a Comment