अयोध्येचे श्रीराम मंदिर हा कोट्यवधी हिंदूंच्या अस्मितेचा
प्रश्न असल्यामुळे सरकार मंदिराच्या उभारणीसाठी साहाय्य करेल, अशी आशा आहे !
नवी देहली - अखिल भारतीय हिंदू महासभा ८ नोव्हेंबर पासून
अयोध्येत राममंदिराच्या उभारणीला प्रारंभ करणार असल्याची घोषणा महासभेचे
राष्ट्रीय अध्यक्ष चन्द्र प्रकाश कौशिक आणि राष्ट्रीय महासचिव मुन्ना कुमार
शर्मा यांनी केली आहे.
मुन्ना कुमार शर्मा यांनी सांगितले की, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई
पटेल यांनी विशेष कायदा करून सोमनाथ मंदिर उभारले होते. त्याचप्रमाणे
राममंदिराच्या उभारणीसाठीही संसदेत विशेष कायदा करण्यात यावा, अशी महासभेने
अनेकवेळा मागणी केली; मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
प्रत्येकवेळी प्रकरण न्यायालयाच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते. हे
लक्षात घेऊन अखिल भारतीय हिंदू महासभेच्या नेत्यांनी आगामी ८ नोव्हेंबर या
दिवशी अयोध्येत राममंदिराच्या उभारणीला प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Post a Comment