मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या वाशी (नवी
मुंबई) येथील मुद्रणालयावर ३ जणांनी दगडफेक केली, तर ठाणे येथील
कार्यालयावरही शाईफेक करण्यात आली. पोलिसांकडून या घटनेचे अधिक अन्वेषण
चालू आहे. दैनिक 'सामना'च्या २५ सप्टेंबरच्या अंकात मराठा मूक
मोर्च्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रामुळे ही घटना घडल्याची
चर्चा होत आहे. 'यात आमचे कार्यकर्ते सहभागी असतील, तर आम्ही या आक्रमणाचे
दायित्व घेऊ', असे संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर यांनी सांगितले. 'या
व्यंगचित्रातून मराठा समाजाचा अपमान करण्यात आला आहे', असे काँग्रेसचे
प्रवक्ता सचिन सावंत यांनी म्हटले; मात्र 'सामना'ने हा आरोप फेटाळून लावला
असून 'मराठा समाजाच्या भावनांचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही', असे
स्पष्ट करण्यात आले होते.
Tuesday, September 27, 2016
दैनिक 'सामना'च्या वाशी येथील मुद्रणालयावर दगडफेक, तर ठाणे येथील कार्यालयावर शाईफेक
Posted by vidarbha on 7:30:00 PM in मुंबई | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment