जळगाव येथे दोन दिवसीय प्रांतीय हिंदु अधिवेशन
डावीकडून पू. नंदकुमार जाधव, कु. रागेश्री देशपांडे, ह.भ.प. प्रसाद महाराज बागुल, ह.भ.प बाळासाहेब अनवर्देकर |
पाळधी (धरणगांव) - हिंदु राष्ट्रासाठी समर्पित भावाने कार्य
करणे आवश्यक आहे. संस्कार नसल्यानेच हिंदु धर्माची वाईट स्थिती आहे. ध्येय
ठेवून जगणारे लोक अल्प आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी धर्माची स्थिती
सुधारण्यासाठी सर्वस्व पणाला लावणे आवश्यक आहे. संघर्ष केल्याविना हिंदु
राष्ट्र येणार नाही. समष्टी साधना करतांना संप्रदायात अडकणे योग्य नाही.
सनातन संस्था ही सर्वांना सामावून घेणारी संस्था असल्यामुळे संस्थेवर बंदी
नको, यासाठी सर्व संप्रदायांनी रस्त्यावर उतरून विरोध करावा, असे
मार्गदर्शन ह.भ.प. प्रसाद महाराज बागुल यांनी केले. येथील दोनदिवसीय
प्रांतीय हिंदु अधिवेशनात ते बोलत होते. येथील साईबाबा मंदिर सभागृहात २४
सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित अधिवेशनास उत्साहात प्रारंभ
झाला.
या वेळी सनातन संस्थेचे संत पू. नंदकुमार जाधव, ह.भ.प. प्रसाद महाराज
बागुल, ह.भ.प बाळासाहेब अनवर्देकर, हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री
देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पू. नंदकुमार जाधव यांचा
सन्मान धर्माभिमानी श्री. आशिष गांगवे यांनी केला, ह.भ.प प्रसाद महाराज
बागुल यांचा सन्मान धर्माभिमानी श्री. गोकुळ सोनवणे यांनी केला. ह.भ.प
बाळासाहेब अनवर्देकर महाराज यांचा सन्मान धर्माभिमानी श्री. प्रकाश पाटील
यांनी केला.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.
निरपराध डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, समीर गायकवाड आणि सनातन संस्था यांच्या
अपकीर्तीचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन
हिंदु राष्ट्र स्थापनेचा जागर करणे आवश्यक आहे. त्यासाठीच हिंदु अधिवेशनाचे
आयोजन केले आहे.
अन्य मार्गदर्शन
ह.भ.प. बाळासाहेब अनवर्दे म्हणाले, "त्यागाने अल्पकाळात हिंदु
राष्ट्र येईल. सर्व संप्रदायांनी धर्मकार्यासाठी एकत्रित त्याग केल्यास
हिंदु राष्ट्र स्थापन होईल !" सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव म्हणाले,
"सनातन संस्था आणि साधक यांचा होणारा छळ, रात्री-अपरात्री होणारी पोलिसांची
चौकशी, अपराध नसतांना कारागृहात असणारे साधक या सर्वांतही संस्थेचे साधक
स्थिर राहून लढा शांतपणे देत आहेत. आनंदाने ईश्वराची इच्छा म्हणून सर्व
स्वीकारत आहे. एवढ्या कठीण प्रसंगात सामान्य व्यक्ती स्थिर राहू शकत नाही,
हे केवळ साधनेनेच शक्य झाले. श्रीकृष्णाची उपासना करून आत्मबळ वाढवूया आणि
धर्मसंस्थापनेच्या कार्यात हातभार लावूया."
Post a Comment