BREAKING NEWS

Monday, September 19, 2016

नियमबाह्य पध्दतीने ठेका रद्द करून कर्मचाऱ्यांकडुन आठवडी बाजाराची वसुली - ४ महिन्यांपासुन न.प. ला बसत आहे लाखोंचा फटका. सभापती नितीन गवळींचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.

चांदुर रेल्वे- (शहेजाद  खान)- 



 
चांदुर रेल्वे नगरपरीषद सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे जिल्हाभर गाजत आहे. अशातच पुन्हा एक प्रकार समोर आला आहे. स्थानिक नगर परीषद अंतर्गत असलेल्या आठवडी बाजाराचा ठेका नगराध्यक्षांनी नियमबाह्य पध्दतीने रद्द करून कर्मचाऱ्यांवर वसुली सोपविली आहे. त्यामुळे नगरपरीषदला गेल्या ४ महिन्यांपासुन लाखोंचा फटका बसत असल्याने तत्काळ नवीन निवीदा प्रसिध्द करून विषय मार्गी लावण्याची मागणी आरोग्य व शिक्षण सभापती नितीन गवळी यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना सोमवारी दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
      स्थानिक आठवडी बाजाराचा ठेका नगर परीषद अंतर्गत दरवर्षी निवीदा प्रसिध्द करून देण्यात येतो. सन २०१६-१७ या वर्षाकरीता आठवडी बाजाराच्या वसुलीचा ठेका संजय निंबर्ते यांना ३ एप्रील रोजी दिला होता. मात्र ठेकेदाराने एकही हफ्ता भरलेला नसल्याची बाब कोणत्याच सभेच सत्ताधाऱ्यांनी इतर सदस्यांच्या लक्षात आणुन दिली नाही. व एक तर्फी निर्णय घेवुन सदर ठेका १५ जुन रोजी नियमबाह्य पध्दतीने रद्द केला. तसेच कर्मचाऱ्यांमार्फत आठवडी बाजाराची वसुली सोपविली. मागील २०१५-१६ च्या वर्षात ५००० ते ६००० रूपये हप्ता नगर परीषदेला येत होता. यावर्षी ९०००-१०००० रूपये हप्ता येणे अपेक्षीत होता. मात्र आता कर्मचारी वसुली करत असतांना केवळ १५०० ते २००० रूपये हप्ता येतो. त्यामुळे गेल्या ४ महिन्यांपासुन नगर परीषदला लाखोंचा फटका बसत असल्याचे नितीन गवळींनी सांगितले. परंतु नियमबाह्य असे  सभागृहाच्या मान्यता न घेता असे करण्याचे नेमके कारण काय असा प्रश्न गवळींनी उपस्थित केला.
           ठेका रद्द केल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडुन तातडीची सभा घेवुन हा विषय निकाली काढला नाही. मागील प्रकरणात ५०००० रूपयांचा विद्युत लाईट दुरूस्तीचा ठेका तब्बल ८१००० रूपयांत देण्यात आला व नगर परीषदचे आर्थीक नुकसान केले. यामुळे वारंवार नगर परीषदेचे लाखोंचे नुकसान होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या पाठिशी भक्कम अनुभवी नेते असतांना न.प.ची सभा चार ते पाच वेळा कोरम अभावी सभा बारगळणेही अत्यंत दुर्भाग्यपुर्ण असल्याची बाब नितीन गवळींनी व्यक्त केली. सत्ताधिकारी यांच्या आपसी वादामुळे मागील नगराध्यक्षा सौ. अंजलीताई अग्रवाल यांना सुध्दा राजीनामा द्यावा लागला. आता सुध्दा अशाच सत्ताधिकारी नगरसेवकांच्या वादामुळे चांदुर वासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बाजाराच्या ठेक्याची निवीदा पुन्हा प्रसिध्द करून हा विषय तत्काळ मार्गी लावावा अशी मागणी शिक्षण, आरोग्य सभापती नितीन गवळी यांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.