चंदीगड - उरी येथील
आतंकवादी आक्रमणाची पंजाबचे शाही इमाम यांनी निंदा केली आहे. मौलाना हबीब
उर रहमान सानी लुधियानवी यांनी म्हटले आहे की, भारत सरकारने पाकसमवेत
असणारे सर्व राजकीय आणि अन्य संबंध समाप्त केले पाहिजे. त्याला जशास तसे
उत्तर दिले पाहिजे. ते लुधियाना येथील जामा मशिदीतील एका सभेला संबोधित करत
होते. या वेळी आतंकवादाच्या विरोधात प्रस्ताव संमत करून हुतात्मा झालेल्या
सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शाही इमाम पुढे म्हणाले की, पाक नेहमीच भारताला धोका देत आला आहे. त्याला आता सहन केले जाऊ नये. पाकचे राज्यकर्तेच आतंकवादाचे सूत्रधार आहेत. अशा शेजारी देशाशी चर्चा होऊ शकत नाही. जो कोणी आतंकवाद करत आहे, त्याला नष्टच केले पाहिजे.
या वेळी मजलिस अहरार इस्लाम हिंद या संस्थेने हुतात्मा सैनिकांच्या परिवाराला प्रत्येकी एक कोटी रुपयांचे साहाय्य करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.

Post a Comment