पुणे- डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर
अंनिसवाल्यांकडून प्रत्येक महिन्याच्या २० दिनांकाला येथील विठ्ठल रामजी
शिंदे पूलावर आंदोलन केले जाते. २० जून २०१६ या दिवशीही आंदोलन घेऊन अंनिस,
तसेच मुस्लिम सत्यशोधक समाज यांच्या कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे सनातन
संस्थेवर आगपाखड केली. वास्तविक शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या
दृष्टीने पुणे पोलिसांनी १८ जून ते १ जुलै या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश
लागू केले होते. या आदेशान्वये मोठ्याने घोषणा देणे, भाषण करणे, सभा घेणे,
तसेच पाचपेक्षा अधिक जणांचा जमाव करणे यांस प्रतिबंध असतो. तरीही अंनिसच्या
वतीने प्रतिबंधात्मक आदेश झुगारून २० जून या दिवशी शिंदे पुलावर आंदोलन
घेण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांचे आदेश न जुमानता अवैधरित्या आंदोलन
घेणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अन्य संलग्न संस्था, तसेच या अवैधरित्या
आंदोलनाला अनुमती देणारे पोलीस अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी,
अशी मागणी हिंदु एकता आंदोलन पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. शैलेंद्र
दीक्षित यांनी केली आहे. या संदर्भात श्री. दीक्षित यांनी मुख्यमंत्री,
तसेच गृहसचिव यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.
Post a Comment