बुलडाणा
– विविध मागण्यासाठी आदिवासी परीषद संघटनाच्या वतीने 31 ऑगस्ट़ रोजी
तहसिल कार्यालय संग्रामपुर येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
मुंबई येथे वरळी पोलिस दलात कार्यरत असलेली माधुरी
वासुदेव सोळंके या महिलेचा 13 ऑगस्ट़ रोजी शारीरीक छळ करुन निघृण हत्या करण्यात आली
होती. या घटनेची सीआयडी चौकशी करा , तक्रार करुनही अद्याप पर्यंत कार्यवाही झाली नाही
आदिवासी समाजावर होणारे अत्याचार थांबवा असे अत्याचार होवू नये यासाठी शासनाने दखल घ्यावी . या मागण्यासांठी आदिवासी हक्क़ परीषदचे
जिल्हाध्यक्ष सोपान सोळंके यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचे निवेदन तहसिलदार एल.के.चव्हाण
यांना देऊन एक दिवशीय धरणे आंदोलन तहसिल कार्यालय संग्रामपुर समोर करण्यात आले. यावेळी
विनोद डाबेराव , हुसेन पालकर , रंजीतसिंग डाबेराव ,देवराव सोळंके आदिसह या धरणे आंदोलनात
सहभागी होते.
Post a Comment