चांदुर रेल्वे : -शहेजाद खान /---
स्थानिक नगरपरीषदंतर्गत धनराज नगर येथील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून उखडलेला आहे, याबाबत अनेक तक्रारी पण झाल्यात असे असतांना त्या रस्त्याची दुरस्ती न करता गरज नसलेल्या व मर्जितल्या गल्ली बोळीमध्ये सिमेंटिकरणाचे काम नगर परिषद करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरीक संजय मोटवाणी यांनी केला आहे.
सविस्तर माहिती नुसार स्थानिक धनराज नगर येथून कुऱ्हारोड कड़े जाणारा सीमेंट रोड गेल्या अनेक वर्षापासून दुरस्तीची वाट पाहत आहे. तर याच परिसरात इतर गल्लीबोळीतील रस्त्यांचे मात्र सीमेंटीकरण सुरु आहे, या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांचा असंतोष वाढत आहे. लवकरच रस्त्यांचे काम सुरु न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मत स्थानिक नागरीक संजय मोटवाणी यांनी व्यक्त केले.

Post a Comment