चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
पाकीस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथील लष्करी मुख्यालयावर काही दिवसांपुर्वी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. शहीदांना शहरातील आदिवासी युवा मंडळ व महिला मंडळ तसेच समता स्पोर्टींग क्लबच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी स्थानिक तहसिल कार्यालयासमोर श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
उत्तर काश्मीरमधील उरी शहरात नकताच मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांसह घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी एका बटालियन मुख्यालयावर हल्ला केला. यामध्ये 17 जवान हुतात्मा झाले आणि अन्य 19 जण जखमी झाले. दरम्यान, चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. यामधील शहीद जवानांना शहरातील आदिवासी युवा मंडळ, आदिवासी महिला मंडळ व भिम नगर येथील समता स्पोर्टींग क्लबतर्फे स्थानिक तहसिल कार्यालयासमोर मेणबत्ती लावुन दोन मिनीटे मौन बाळगुन श्रध्दांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रमाला प्रमुख प्राहुणे म्हणुन शिक्षण व आरोग्य सभापती नितीन गवळी, बांधकाम सभापती शंकरलाल माणकानी, माजी सरपंच उमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, राजु गजभिये, सलामे, टेकाम, स्टेशन मास्टर वाजपेयी आदींची प्रामुख्याने उपस्थीती होती. शहीद जवानांमध्ये शहरापासुन जवळच असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथील विकास उईके यांचा सुध्दा समावेश आहे. यावेळी विकास उईके अमर रहे अमर रहे असे नारे सुध्दा देण्यात आले.
यावेळी उमेश मडावी, कुंदन नाईक, पवन कुमरे, श्याम धुर्वे, अंकुश हटवार, शैलेश वाढवे, सुरज मडावी, योगेश भलावी, राजु मडावी, भरत उईके, दिगांबर उईके, गुणवंत सयाम, मंगेश सिरसाम, किशोर सिरसाम आदींसह महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

Post a Comment