रामनाथी (गोवा) - सनातन संस्थेच्या
धर्मप्रसाराच्या समाजातील वाढत्या कार्याची व्याप्ती आणि संस्थेचा समाजात
असलेला नावलौकिक माहिती असतांना संस्थेची अपकीर्ती करण्याच्या हेतूने दैनिक
लोकमतचे संपादक राजू नायक यांनी सनातन्यांचे काय करावे ? या मथळ्याखाली
संस्थेच्या विरोधात मानहानीकारक संपादकीय पणजी, गोवा येथून प्रकाशित
होणार्या दैनिक लोकमतच्या गोवा आवृत्तीच्या ३ जून २०१६ या दिवशीच्या अंकात
प्रसिद्ध करून संस्थेची मानहानी केली. त्यामुळे सनातन संस्थेची अपरिमित
हानी झाली. त्यामुळे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र
मराठे यांनी संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार श्री. रामदास केसरकर
यांच्यामार्फत या दैनिकाचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांना
१४.७.२०१६ या दिवशी कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटी १० कोटी
रुपयांची मागणी केली होती; परंतु त्यांनी कायदेशीर नोटिशीतील संस्थेच्या
मागणीची पूर्तता केली नाही. त्यामुळे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय
विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते श्री. गजानन
नाईक, श्री. नागेश ताकभाते, कु. दीपा तिवाडी आणि श्री. रामदास केसरकर
यांच्यामार्फत दैनिक लोकमतचे संपादक राजू नायक, मालक लोकमत मिडिया प्रा.
लि., मुद्रक आणि प्रकाशक बालाजी मुळे यांच्या विरोधात मानहानी भरपाईपोटी १०
कोटी रुपये मागणीचा दिवाणी दावा फोंडा, गोवा येथील दिवाणी न्यायाधीश
(वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयात प्रविष्ट केला आहे.
Post a Comment