पोलीस म्हटले म्हणजे कायद्याचे काटेकोर पालन करणारे, शीस्तप्रिय आणि
सत्याची बाजू घेणारे कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख होती; परंतु
आजकाल पोलिसांचे काम हे चोर सोडून संन्याशाला फाशी आणि दाम करी काम या
म्हणींप्रमाणे चालू आहे, हे नागरिक आणि हिंदू यांना पदोपदी अनुभवायला
मिळते. आजचे पोलीस हे कोणत्याही गुन्ह्याचे तपासकाम अयोग्य दिशेने,
कायद्याच्या चौकटीत न राहता आणि घडलेल्या गुन्ह्याचा सखोल तपास न करता करत
असतात. त्यामुळे मालदार असलेले आणि राजकीय नेत्यांशी संबंध असलेले खरे
गुन्हेगार राजरोस फिरतात, तर गरीब आणि निर्दोष हिंदु धर्माभिमानी
व्यक्तींना खोट्या स्वरूपाच्या गुन्ह्यांना तोंड देऊन बळी पडावे लागते.
निष्पाप आणि निर्दोष व्यक्तींनी कोणताही गुन्हा केलेला नसतांना आणि निर्दोष
असतांनाही पोलीस कोठडीत रहावे लागते आणि पोलीस कोठडीत पोलिसांच्या
अत्याचाराला देखील सामोरे जावे लागते.
Post a Comment