नाशिक - गुणवत्ता (मेरीट) हे एकच आरक्षण हवे. दुसरे
आरक्षण लागू केले, तर प्रगती होणार कशी ? स्पर्धात्मक युगात टिकणार कसे,
असे ठाम प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे
भोसले यांनी येथील मराठा क्रांती महा मूक मोर्च्यानंतर गोल्फ क्लब येथील
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर पत्रकार परिषदेत केले.
मराठा क्रांती विराट मूक मोर्च्यामध्ये विविध तालुक्यांतून आलेले मराठा समाजातील शाळकरी विद्यार्थी, तरुण, तरुणी, महिला, वयोवृद्ध आदी लक्षावधी नागरिक सहभागी झाले होते. निषेधाचे फलक, भगवे ध्वज, काळे कपडे या गोष्टींमुळे या मोर्च्याने लक्ष वेधून घेतले. कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी आदी विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

उदयनराजे भोसले यांनी
पत्रकार परिषदेत केलेली विधाने
- कोपर्डी घटनेतील आरोपींना लोकांसमोर फाशी द्या. त्यांना लोकांसमोर गोळ्या घाला.
- अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत आहे. त्याचा न्यायनिवाडा त्वरित करा.
- मूठभर संकुचित स्वार्थी लोकांमुळे प्रकल्प रखडले. अशा राजकारण्यांची मालमत्ता जप्त करा आणि त्यांना कारागृहात टाका.
- मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अधिवेशन बोलवा. जे तुमच्या मागण्या पूर्ण करतील, अशांना निवडून द्या !
Post a Comment