प्रमोद नैकेले/---
अचलपूर:- अचलपूर परतवाडा शहरातील नामांकीत काँलनी म्हणजे ब्राम्हण सभा येथे शहरातील मोठया हस्ती राहतात व सुखवस्तू रहिवासी या विभागात वसले आहेत.पण सुरक्षेबाबत सध्या येथे काही कमतरता जाणवत आहे म्हणूनच या परिसरात चो-यांचे सत्र सुरूच आहे.
ब्राम्हण सभा येथे काही दिवसांपासून सतत घरफोडीचे प्रकार होत आहेत मात्र सुरक्षा व्यवस्था पाहिजे तशी नसल्याने या घटना वारंवार होत आहे.नुकतेच येथील रहिवासी ज्ञानदेव फाटे जे आपल्या पत्नीच्या कँन्सर आजाराचा उपचार करण्याकरिता नागपूरला गेलेले पाहून चोरट्यांनी 23 सप्टेंबरला रात्री 1.30 च्या सुमारास हात साफ केला.ही गोष्ट रात्री एका परिसरातील व्यक्ती च्या लक्षात सुध्दा आली पण घरचे व्यक्ती आले असतील म्हणून त्याने दुर्लक्ष केले चोरटे रात्रभर घरात धुमाकुळ घालून पळून गेले.सकाळी ही घटना सर्वांचे लक्षात आली.घटनेची माहिती घरमालक नागपूरला असल्याने पोलिसांना कोण देणार व विनाकारण पोलीसांच्या भानगडीत कशाला उगाच पडायचे म्हणून येथील नागरिकांनी तक्रार नोंदवली नाही उलट हा प्रकार लपवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.असे करतांना त्यांच्या हे लक्षात आले नाही की अशा संकटात आपणही येवू शकतो दुसरी गोष्ट अशी की आजच्या इंटरनेटच्या जगात अजूनही अज्ञान आहे.साधी एकमेका विषयीची सहानुभूती सुध्दा राहीलेली दिसत नाही तसेच ही काँलनी परतवाड्यातील प्रमुख काँलनी असून शहरातील अनेक नामवंत नागरीक येथे राहतात व ही शहरातील मुख्य रस्त्यावर वसलेली काँलनी आहे मात्र सुरक्षितते बाबत येथे कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत म्हणून अशा घटना वारंवार होत असल्याचे दिसून येते आहे.
Saturday, September 24, 2016
*ब्राम्हण सभेत चो-यांचे सत्र सुरूच_उच्चभ्रू पोलीसांच्या भानगडीत न पडता चोरी प्रकरणावर टाकत आहेत पर्दा*
Posted by vidarbha on 8:34:00 PM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment