चेन्नई - चित्रपटातील अश्लील शब्द आणि गाणी यांमुळे तरुण पिढीच्या
मनामध्ये दुष्ट विचार येतात, असे चेन्नई उच्च न्यायालयाने सांगितले.
चित्रपट क्षेत्रातील लोकांनी स्वत:चे सामाजिक दायित्व लक्षात घ्यावे, असे
आवाहनही उच्च न्यायालयाने केले आहे. एका तरुणाने चित्रपटातील अश्लील गाणे
म्हणत एका महिलेशी गैरवर्तणूक केली होती. या प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी
केलेल्या अर्जावरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती एस्. वैद्यनाथन् यांनी
वरील उद्गार काढले
चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते चित्रपटांच्या माध्यमातून तरुण पिढीवर चांगले संस्कार करण्याऐवजी अश्लील गाणी आणि शब्दप्रयोग यांचा वापर करतात, तसेच चित्रपटांमधून हिंसाचाराच्या घटना दाखवतात. त्याद्वारे तरुण पिढीची मने बिघडत असल्याविषयी न्यायालयाने खेद व्यक्त केला. त्यामुळेच आपली संस्कृती आणि नैतिकता खालावत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती एस्. वैद्यनाथन् यांनी आरोपीला जामीन संमत केला. आरोपीने ५ आठवडे कारागृहात घालवल्याने त्याला चौकशीसाठी आणखी पोलीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, असे न्यायाधिशांनी निकालात म्हटले.

Post a Comment